शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

वेतनाच्या मागणीसाठी मनपा कर्मचा-यांचे आंदोलन

By admin | Updated: June 4, 2016 02:22 IST

चार महिन्यांचे वेतन थकीत; लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर ‘थाळी वाजवा’आंदोलन.

अकोला: चार महिन्यांचे वेतन थकीत असल्यामुळे कुटुंबाचा गाडा कसा हाकावा, या विवंचनेत असलेल्या महापालिका कर्मचारी संघर्ष समितीने शुक्रवारी लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर जाऊन ह्यथाळी वाजवाह्ण आंदोलन केले. वेतनावर तातडीने तोडगा न काढल्यास अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा सज्जड इशारा संघर्ष समितीने दिला.राज्य शासनाने एलबीटी रद्द केल्यामुळे मनपाच्या प्रमुख उत्पन्नाचा मार्ग बंद पडला. एलबीटीच्या बदल्यात मनपाला महिन्याकाठी ४ कोटी २२ लाख रुपये देणे अपेक्षित असताना शासनाने एलबीटीच्या अनुदानात कपात करण्याचे धोरण स्वीकारले. याचा परिणाम कर्मचार्‍यांच्या वेतनावर होऊन थकीत वेतनाची समस्या पुन्हा निर्माण झाली. वेतनाचा तिढा निकाली निघत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेत, मनपा कर्मचारी संघर्ष समितीने २५ मेपासून संप पुकारला. संपाला दहा दिवस होत असताना तोडगा निघत नसल्याचे पाहून शुक्रवारी संघर्ष समितीने लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर ह्यथाळी वाजवाह्ण आंदोलन छेडले. सर्वप्रथम आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निवासस्थानासमोर जाऊन त्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर खा. संजय धोत्रे, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर आणि पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी संघर्ष समितीचे अध्यक्ष पी.बी. भातकुले, कार्याध्यक्ष अनिल बिडवे, सचिव विठ्ठल देवकते, उपाध्यक्ष कैलास पुंडे, अनुप खरारे, विजय पारतवार, शांताराम निंधाने, विजय सारवान, रवींद्र शिरसाट, नंदकिशोर उजवणे, जी.आर. खान, ओम ताडम, महादेव शिरसाट, प्रकाश घोगलीया, पी.व्ही. पाटील, अजीज सर, वसंत पवार, एस.एल.चवने, किशोर सोनटक्के, धनराज सत्याल, संजय पाटील, गजानन ढगे, संजय कथले, अशोक सोळंके, हेमंत शेळवणे, महादेवराव पाटील, राजेश साळुंखे, बबलू सारवान, प्रवीण भालेराव, श्याम गाढे, नीलेश घावरे, सुनील इंगळे, यशवंत दुधांडे, प्रताप झांझोटे आदींसह असंख्य कर्मचारी उपस्थित होते.