शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

‘त्या’ तीन इमारतींचा भाग हटविण्यासाठी मनपात हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 09:30 IST

अकोला : गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणार्‍या तीन इमारतींचा काही भाग हटविण्यासाठी मनपाच्या प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.

ठळक मुद्देगोरक्षण रोडवरील ‘बॉटल नेक’चा तिढा होणार दूर!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणार्‍या तीन इमारतींचा काही भाग हटविण्यासाठी मनपाच्या प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. इन्कम टॅक्स चौकातील मुक्ता प्लाझा कॉम्प्लेक्स, श्रद्धा हाइट्स व गोविंद सोढा यांच्या इमारतीवर कोणत्याही क्षणी मनपाचा गजराज चाल करण्याची दाट शक्यता आहे. मनपाच्या कारवाईमुळे ‘बॉटल नेक’चा तिढा निकाली निघण्याची अपेक्षा आहे.गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाचे काम सुरू होण्याला एक वर्षापेक्षा जास्त अवधी होत आहे. यादरम्यान, महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंत रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूंच्या इमारतींमुळे ५00 मीटर अंतरावर ‘बॉटल नेक’ निर्माण होणार असल्याचा मुद्दा ‘लोकमत’ने लावून धरला. शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यापैकी एक असलेल्या  गोरक्षण रोडवर ही समस्या कायम राहिल्यास भविष्यात या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होणार असल्याचे चित्र होते. ही बाब लक्षात घेता मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूंच्या इमारतींचे मोजमाप घेऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी साडेचार मीटर जागा संपादित केली. रस्त्याच्या आड येणार्‍या इमारतींचा भाग हटविण्याची कारवाई मनपाने सुरू करताच मालमत्ताधारकांनी स्वत:हून इमारतीचा भाग पाडण्यासाठी मुदत मागितली. तीन महिन्यांचा कालावधी होत आला तरी अद्यापही काही मालमत्ताधारकांनी इमारतीचा भाग तोडला नसल्याचे महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या निदर्शनास येताच त्यांनी कारवाईचे हत्यार उपसले आहे.तीन महिन्यांपासून ‘टाइमपास’गोरक्षण रोडवरील मुक्ता प्लाझा कॉम्प्लेक्स, श्रद्धा हाइट्स व गोविंद सोढा यांच्या व्यावसायिक इमारतींचे बांधकाम अद्यापही कायम आहे. तीन महिन्यांपासून संबंधित मालमत्ताधारकांनी मनपा प्रशासनासोबत ‘टाइमपास’ चालविला असल्याचे दिसत आहे. या प्रकारामुळे गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला खीळ बसली आहे.राजकीय दबावतंत्राचा वापरशहरातील विकास कामांना अनेकदा अडथळे निर्माण होतात. गोरक्षण रोड प्रकरणातही काही मालमत्ताधारक मनपा प्रशासनावर राजकीय दबावतंत्राचा वापर करीत असल्याची माहिती आहे. राजकीय नेते, पदाधिकार्‍यांनी प्रशासनावर दबावतंत्राचा वापर केल्यास भविष्यात शहरातील कोणत्याही रस्त्यांचे रुंदीकरण होणार नसल्याचे बोलल्या जात आहे.

टॅग्स :Gaurakshan Roadगौरक्षण रोडAkola cityअकोला शहर