शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कला शिक्षकांच्या नियुक्तीसाठी मनपात हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 15:03 IST

अकोला: महापालिकेच्या शिक्षण विभागात कार्यरत अस्थायी नऊ कला शिक्षकांना मनपा प्रशासनाने बडतर्फ केले होते. यापैकी सात बडतर्फ शिक्षकांनी शिक्षण विभागात पुनर्नियुक्तीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

अकोला: महापालिकेच्या शिक्षण विभागात कार्यरत अस्थायी नऊ कला शिक्षकांना मनपा प्रशासनाने बडतर्फ केले होते. यापैकी सात बडतर्फ शिक्षकांनी शिक्षण विभागात पुनर्नियुक्तीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मध्यंतरी संबंधित कर्मचाऱ्यांनी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांची भेट घेऊन सेवेत सामावून घेण्याची विनंती केली होती. त्यानुषंगाने बडतर्फ शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीच्या फाइलचा प्रवास नव्याने सुरू झाला असून, याप्रकरणी नागपूर हायकोर्टाचा आदेश लक्षात घेता आयुक्त संजय कापडणीस, उपायुक्त विजयकुमार म्हसाळ काय अभिप्राय देतात, याकडे सुज्ञ अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.महापालिकेच्या शिक्षण विभागात कार्यरत अस्थायी नऊ कला शिक्षकांची नियुक्ती नियमबाह्य असल्याचा मुद्दा शिक्षण विभागाने उपस्थित केला होता. शिक्षण विभागाचा अभिप्राय लक्षात घेऊन एकाच मुद्यावर काही अस्थायी कला शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अनेक याचिका दाखल करून ठेवल्या होत्या. यातील काही शिक्षकांना पाचव्या वेतन आयोगाची रक्कम व महागाई भत्ता अदा झाल्याचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक संजय गणोरकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सदर शिक्षकांची नियुक्ती नियमबाह्य असल्यामुळे त्यांना अदा केलेली रक्कम वेतनातून वसूल करण्याचा आदेश जारी केला होता. यादरम्यान, नागपूर खंडपीठानेसुद्धा अस्थायी शिक्षकांबद्दल मनपा प्रशासनाने ठोस निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. शिक्षण विभागातील कर्मचाºयांना हाताशी धरून जाणीवपूर्वक निर्माण केलेला गोंधळ ध्यानात घेता महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी अस्थायी कला शिक्षकांच्या नियुक्ती प्रकरणाचा बारकाईने अभ्यास करून निष्कर्षाअंती सर्व नऊ कला शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई केली होती.कापडणीस म्हणाले, नियमानुसार होईल!बडतर्फ शिक्षकांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी तत्कालीन आयुक्त अजय लहाने, जितेंद्र वाघ यांच्यावर भाजपमधील एका नेत्याकडून सातत्याने दबावतंत्राचा वापर करण्यात आला. याप्रकरणी नागपूर हायकोर्टाचा आदेश लक्षात घेता हा दबाव झुगारत तत्कालीन दोन्ही आयुक्तांनी बडतर्फ शिक्षकांना बाजूला सारले. त्यानंतर संबंधित कर्मचाºयांनी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना विनंती केली असता, त्यांनी नियमानुसार कामकाज होणार असल्याचे स्पष्ट केले होते.फाइलचा प्रवास सुरू; अधिकाºयांची परीक्षाबडतर्फ कर्मचाºयांच्या फाइलचा प्रवास नव्याने सुरू झाला आहे. याप्रकरणी तत्कालीन दोन्ही आयुक्तांनी घेतलेली भूमिका पाहता आयुक्त संजय कापडणीस व उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांची कसोटी लागणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका