शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

माउंट कारमेल शाळेतील विद्यार्थी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:21 IST

माउंट कारमेल स्कूलमध्ये दुसर्‍या वर्गात शिक्षण घेत असलेला एक विद्यार्थी बुधवारी सकाळी शाळेत असताना तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला इजा असल्याने एका मोठय़ा खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर प्रकरण चिघळणार असल्याने, तसेच शाळेच्या विरोधात काही लोकांनी नारेबाजी केल्याने या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देपोलिसांनी नोंदविले बयानविद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर इजा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : माउंट कारमेल स्कूलमध्ये दुसर्‍या वर्गात शिक्षण घेत असलेला एक विद्यार्थी बुधवारी सकाळी शाळेत असताना तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला इजा असल्याने एका मोठय़ा खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर प्रकरण चिघळणार असल्याने, तसेच शाळेच्या विरोधात काही लोकांनी नारेबाजी केल्याने या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. माउंट कारमेल शाळेमध्ये मो. इझहान हा दुसर्‍या वर्गात शिक्षण घेत आहे. बुधवारी सकाळी जेवणाची सुटी झाल्यानंतर विद्यार्थी बाहेर खेळत असताना मो. इझहानच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या डोक्यात काठी मारल्याचे किंवा त्याच्या पायात पाय टाकून त्याला खाली पाडल्याने तो गंभीर जखमी झाल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. इझहान जमिनीवर कोसळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यानंतर येथील शिक्षकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल न करता पालकांना माहिती दिली. पालकांना येण्यास वेळ झाल्याने विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर झाली. पालक शाळेत आल्यानंतर त्यांनी मुलास घेऊन रुग्णालय गाठेपर्यंत विद्यार्थी बेशुद्धावस्थेत गेला होता. माउंट कारमेल शाळा व्यवस्थापनाच्या दिरंगाईमुळे एका विद्यार्थ्याचा जीव धोक्यात आल्याचा आरोप करीत काही नागरिकांनी या परिसरात गुरुवारी सकाळी नारेबाजी केली. या प्रकाराची माहिती रामदास पेठ पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला. त्यानंतर रामदास पेठ पोलिसांनी विद्यार्थी व शिक्षकांचे बयान नोंदविले असून, हा प्रकार नेमका कसा घडला, याचा शोध घेण्यात येत आहे.

सदर विद्यार्थी जेवणाच्या सुटीमध्ये खेळत असताना अचानक कोसळला, त्याला शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी किवा अन्य कुणीही मारहाण केली नाही. या विद्यार्थ्याच्या डोक्याला नेमकी कशामुळे इजा झाली याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. शाळा प्रशासन सर्व सहकार्य करीत आहे.- फादर जॉर्ज मॅथ्यू, माउंट कारमेल स्कूल

मुलगा गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सदर प्रकरणाची तक्रार प्राप्त नाही. शिक्षक व विद्यार्थ्यांचे बयान नोंदविण्यात येत आहे. या संदर्भात मुलाच्या आई-वडिलांनीही कुणाची तक्रार केली नाही. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.- शैलेश सपकाळ, ठाणेदार, रामदास पेठ पोलीस स्टेशन