विश्व हिंदू परिषद व बजरंग दलद्वारा शहरात भव्य मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीची सुरुवात अकोला मार्गावरील आप्पास्वामी कॉलनीतील श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संकलन अभियान कार्यालयापासून झाली. रॅली अकोला मार्ग, शिवाजी चौक, सोनू चौक, जयस्तंभ चौक, जिनगरवाडी, केशवराज वेटाळ, सोमवार वेस, नंदीपेठ कॉलेज रोड, यात्रा चौक या मार्गाने मार्गाक्रमण करीत आली. तिचा समारोप नरसिंग मंदिर प्रांगणात श्रीरामाच्या जयघोषाने करण्यात आला.
यावेळी रॅलीचे अग्रभागी श्रीराम लक्ष्मण, सीता व हनुमान यांची वेशभूषा साकारलेली बालके होती. त्यापाठोपाठ मोटारसायकलवर भगवे ध्वज व फेटे परिधान केलेले श्रीराम सेवक व युवक होते. रॅलीसाठी विश्व हिंदू परिषदेचे गजानन माकोडे, वामन जकाते, अनिल आप्पा गोडागंरे, सारंग कराळे, मोहित काशीकर, चंदू दुबे, अनंता मिसाळ, गोपाल कटाळे, जगदीश दातीर, विजय गोटे, विजय कुलट, विजय चंदन, सुनील पवार, अजय कुलकर्णी, पवन पालेकर, पपू कैसर यांनी परिश्रम घेतले. यावेळी रॅली मार्गावर ठिकठिकाणी शहर ठाणेदार संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त होता.
फोटो