शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मदर मिल्क बँक शिशूंसाठी संजीवनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 12:14 IST

अकोला : नवजात शिशूंसाठी आईचे दूध हे अमृतच... पण काहींना आईचे दूध मिळत नाही, अशा नवजात शिशूंसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मिल्क बँक संजीवनी ठरू पाहत आहे.

- प्रवीण खेते  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नवजात शिशूंसाठी आईचे दूध हे अमृतच... पण काहींना आईचे दूध मिळत नाही, अशा नवजात शिशूंसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मिल्क बँक संजीवनी ठरू पाहत आहे. साधारणत: वर्ष-दीड वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या मिल्क बँकेमध्ये दररोज १० ते १२ नवजात शिशूंना आईच्या दुधाचा गोडवा मिळत आहे.अनेक नवजात शिशूंना आईचे पौष्टिक दूध मिळत नाही, अशा शिशूंना हे दूध मिळावे, यानुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘मिल्क बँक’ जवळपास दीड वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली आहे. प्रसूतीनंतर काही मातांना दूध येत नाही, अशा नवजात शिशूंसह काही अनाथ शिशूंनाही आईच्या दुधाची गरज असते. ही गरज भागविण्यासाठी ही मिल्क बँक आईचे दूध संकलित करून त्या शिशूंना आईच्या दुधाचा गोडवा देत आहे. हे करीत असताना मिल्क बँकेसमोर अनेक अडचणीही येतात; पण स्तनदा मातांच्या सहकार्याने दररोज अशा नवजात शिशूंना आईचे दूध मिळणे शक्य होत आहे. शून्य ते सहा महिने वयोगटातील या नवजात शिशूंना आईचे दूध मिळाल्याने त्यांचा अनेक आजारांपासून बचाव होत असून, अ‍ॅन्टीबायोटिक देण्याची गरज नाही. शिवाय, बालमृत्यू दरही कमी होण्यास मदत होत आहे. सध्या एक छोटेसे रोपटे असले तरी आगामी काळात शेकडो नवजात शिशूंसाठी ही मिल्क बँक जीवनदायिनी ठरणार आहे.‘एनएचएम’कडे मनुष्यबळाची मागणी मिल्क बँकेचे कार्यक्षेत्र मर्यादित असल्याने प्रत्येकापर्यंत हा उपक्रम पोहोचला नाही. संकलित दुधाची क्षमता वाढविण्यासोबतच त्याचा लाभ प्रत्येक गरजवंतापर्यंत पोहोचावा, यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासंदर्भात जीएमसी प्रशासनातर्फे ‘एनएचएम’कडे मागणी करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने आहार तज्ज्ञ, परिचारिकांचा समावेश आहे.

मिल्क बँकेच्या माध्यमातून अनेक नवजात शिशूंना आईचे दूध मिळत आहे. लवकरच या मिल्क बँकेचे कार्यक्षेत्र वाढणार असून, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- डॉ. विनीत वरठे,बालरोग विभाग प्रमुख, जीएमसी.

टॅग्स :AkolaअकोलाmilkदूधAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय