शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

आता जिल्हा स्त्री रुग्णालयातही 'मदर मिल्क बँक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 10:51 IST

प्रस्तावित मिल्क बँक ही अडीच हजार स्वेअर फूट क्षेत्रामध्ये निर्मित केली जाणार असून, त्यासाठी जवळपास दीड कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देस्तनदा मातांच्या सहकार्याने दररोज नवजात शिशूंना आईचे दूध मिळणे शक्य होईल.शून्य ते सहा महिने वयोगटातील अशा नवजात शिशूंचा अनेक आजारांपासून बचाव होईल.त्यांना अ‍ॅन्टीबायोटिक देण्याची गरज राहणार नाही.

- प्रवीण खेतेअकोला : नवजात बालकासाठी आईचं दूध हे अमृततुल्यच... पण अनेकांच्या नशिबी आईचं दूध नसतं, अशा प्रत्येक नवजात शिशूंना आईचं दूध मिळणे शक्य होणार आहे. २०२० मध्ये मिल्क बँकेच्या नव्या इमारतीच्या बांधकामास सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. यापूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिल्क बँक सुरू झाली असून, ती नवजात शिशूंसाठी संजीवनी ठरत आहे.प्रसूतीनंतर अनेक मातांना दूध येत नाही, अशा नवजात शिशूंसह काही अनाथ शिशूंनाही आईच्या दुधाची गरज असते. ही गरज भागविण्यासाठी नव्या वर्षात जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘मिल्क बँक’ सुरू करण्यात येणार आहे. प्रस्तावित मिल्क बँक ही अडीच हजार स्वेअर फूट क्षेत्रामध्ये निर्मित केली जाणार असून, त्यासाठी जवळपास दीड कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती आहे. मिल्क बँक सुरू झाल्यानंतर येथे आईचे दूध संकलित करून अनेक शिशूंना आईच्या दुधाचा गोडवा मिळणार आहे. ही मिल्क बँक सुरू झाल्यास आगामी काळात शेकडो नवजात शिशूंसाठी जीवनदायिनी ठरणार आहे.हे होतील फायदे...

  • पण स्तनदा मातांच्या सहकार्याने दररोज नवजात शिशूंना आईचे दूध मिळणे शक्य होईल.
  • शून्य ते सहा महिने वयोगटातील अशा नवजात शिशूंचा अनेक आजारांपासून बचाव होईल.
  • त्यांना अ‍ॅन्टीबायोटिक देण्याची गरज राहणार नाही.
  • बालमृत्यू दरही कमी होण्यास मदत होईल.

गरज जनजागृतीचीअनेकांपर्यंत ही मिल्क बँक पोहोचली नसल्याने अनेक गरजू नवजात शिशूंना आईचे दूध मिळत नाही. स्तनदा मातांपर्यंत मिल्क बँक पोहोचलीच नसल्याने अनेकांना याबाबत माहिती नाही. त्यामुळे मिल्क बँकेच्या जनजागृतीची गरज आहे. रक्तदानाप्रमाणेच स्तनदा मातांना दूध दानासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.नववर्षात ‘सेंटर आॅफ एक्सलन्स’ही होईल सुरू!

  • जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘सेंटर आॅफ एक्सलन्स’ सुरू होणार आहे.
  • यांतर्गत नवजात शिशूंच्या पालकांना मार्गदर्शन केले जाईल.
  • येथे कार्यरत कर्मचाऱ्यांनाही नवजात शिशूंच्या आरोग्यविषयक प्रशिक्षण दिले जाईल.
  • कंगारूहेल्प केअर सेंटरमध्येही प्रशिक्षण राबविण्यात येईल.

जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रस्तावित मिल्क बँकेच्या निर्माण कार्याला नववर्षात सुरुवात होण्याची शक्यता आहे. मिल्क बँक सुरू झाल्यास अनेक बालकांना आईचं दूध मिळणार असून, बालमृत्यू दर कमी होण्यास मदत होईल.- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाLady Harding Hospitalलेडी हार्डिंग रुग्णालय