शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांच्या चिमुकलीसह आईचा घुंगशी बॅरेजमध्ये बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2022 18:19 IST

Mother drowned in Ghungshi barrage with two-year-old Girl : आराध्या (वय २ वर्ष) हिचा पाय घसरुन बॅरेज मध्ये असलेल्या पाण्यात कोसळली.

ठळक मुद्दे वडिलांना वाचविण्यात यश  घुंगशी बॅरेज पारद येथील घटना 

मूर्तिजापूर : तालुक्यातील पारद  येथील घुंगशी बॅरेज वरुन येत असताना  चिमुकली आराध्या (वय २ वर्ष) हिचा पाय घसरुन बॅरेज मध्ये असलेल्या पाण्यात कोसळली. तिला वाचविण्यासाठी आई व वडीलांनी पाठोपाठ पाण्यात उडी घेतली. यात चिमुकलीसह आईचा मृत्यू झाला. उपस्थित चौकीदाराच्या प्रसंगावधानाने वडीलाचे प्राण वाचले. सदर घटना ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली.             पारद येथील रहिवासी असलेले गौरव सुरेश तायडे (वय ३२ वर्ष ) हे पत्नी प्रिया गौरव तायडे (२८) व मुलगी आराध्या (२) हे तिघे नदिपलीकडे असलेल्या दर्यापूर तालुक्यातील धामोडी या गावी  मावशीच्या अंत्यविधीचा गेले होते. अंत्यविधी आटोपून दुसऱ्या दिवशी  दि  ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वा दरम्यान परत येत असताना  बॅरेज जवळ आल्यानंतर गेट बंद असल्याने चौकीदार संजय भाऊराव गवई यांना चावी मागीतली या दरम्यान मुलगी गेट बाजुला गेली तेव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली.  तिला वाचवण्यासाठी आई प्रिया व वडिल गौरव यांनी पाण्यात उडी घेतली. यावेळी चौकीदार संजय गवई यांनी आरडाओरडा केला तेंव्हा बाजूला असलेल्या भोई समाजातील युवक धावुन आले व त्यांनी पाण्यात दोर फेकला या दरम्यान माय लेकीचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला. परंतु वडील गौरव यांने दोर पकडल्याने त्याचे प्राण वाचले.          घुंगशी बॅरेज पारद येथे असले तरी घटनास्थळाचा भाग दर्यापूर पोलिस स्टेशन हददित येत असल्याने घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिस व जिल्हा शोध बचाव पथक जिल्हाधिकारी पथकासह  घटनास्थळी दाखल झाले, शोध पथकाने शोध मोहीम सुरू करताच  प्रथम आई ( प्रिया)हिचा मृतदेह सापडला आणि त्यानंतर चिमुकली कु आराध्या हिचा मृतदेह सापडला दोन्ही मृतदेह शवविच्छेदन साठी दर्यापूर येथे पाठविण्यात आले आहेत. पुढील तपास ठाणेदार आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर पोलीस करीत आहे.  

घटनेबाबत चौकशी व्हावी - प्रियाच्या वडिलांची तक्रार

मृतक प्रिया गौरव तायडे व तिची मुलगी आराध्या यांच्या मृत्यू बद्दल प्रियाचे वडील विठ्ठल गोविंदराव फुंडकर राहणार हनवतखेडा यांनी आक्षेप घेत दोघींचा मृत्यू नेमका पाय घसरून किंवा उडी घेतली की, यांना पाण्यात ढकलून देण्यात आली अशी शंका उपस्थित करुन या आशयाची तक्रार दर्यापूर पोलीसात दाखल केली.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला