शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मोर्णा नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव नीती आयोगाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 13:44 IST

अकोला : ‘महाराष्ट्र स्वच्छ नदी अभियान’अंतर्गत राज्यातील १७ नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी शासनाने राज्यातील १७ नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा नीती आयोगाकडे प्रस्ताव सादर केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘महाराष्ट्र स्वच्छ नदी अभियान’अंतर्गत राज्यातील १७ नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी शासनाने राज्यातील १७ नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा नीती आयोगाकडे प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये मोर्णा नदीचा समावेश असून, प्रस्तावात नदीच्या कामासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे.गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर मोर्णा नदीच्या सौंदर्यीकरणासाठी २०१६ मध्ये भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला होता. शहराच्या मध्यभागातून वाहत गेलेल्या मोर्णा नदीचे आजचे चित्र अतिशय लाजिरवाणे आहे.शहरातील नाले-गटारांमधील पाणी वाहून जाण्यासाठी नदीचा वापर केला जातो. गुजरातमध्ये साबरमती नदीच्या धर्तीवर मोर्णा नदीच्या सौंदर्यीकरणासाठी केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी पुढाकार घेत यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले होते.त्या पृष्ठभूमीवर योजनेचा आवाका मोठा असल्याने मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी तांत्रिक सल्लागारपदी विनायक कौंडिण्य यांची नियुक्ती केली होती.त्यावेळी कौंडिण्य यांनी आस्टूल-पास्टूल येथून नदीच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली होती. यादरम्यान, मोर्णा नदीच्या पात्राची आणि नदीकाठच्या परिसराची मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती आहे.सांडपाण्यावर प्रक्रिया नाहीच!मनपा क्षेत्रातील घाण सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासनाकडून थेट मोर्णा नदीचा वापर केला जात आहे. सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार राज्यातील नद्यांच्या प्रदूषित टप्प्यांची संख्या अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्यातील १७ नद्यांमध्ये मोर्णेचा समावेश स्वच्छ नदी अभियान अंतर्गत राज्यातील १७ नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव आहे. यामध्ये मोर्णा नदीचा समावेश असल्यामुळे अकोलेकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

सांडपाणी नदीत सोडण्यावर निर्बंध‘महाराष्ट्र स्वच्छ नदी अभियान’अंतर्गत यापुढे मोर्णा नदीच्या पात्रात सांडपाणी सोडण्यावर निर्बंध घातल्या जाणार आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, जनजागृती करणे, नदी परिसरात झाडे लावणे असे उपक्रम राबविल्या जातील. पाण्याच्या गुणवत्तेचे प्रत्यक्ष निरीक्षण आणि नियंत्रणासाठी यंत्रणा उभारण्याची तरतूद आहे.मोर्णा नदीला नवसंजीवनी मिळवून देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला जात आहे. भूमिगत गटार योजना कार्यान्वित झाल्यानंतर नदीपात्रात सांडपाणी सोडल्या जाणार नाही. त्यामुळे इतर विकास कामे करण्यासाठी मोठा वाव राहील.-विजय अग्रवाल, महापौर.

टॅग्स :Morna Riverमोरणा नदीAkolaअकोलाNIti Ayogनिती आयोग