शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

 मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला आले लोकचळवळीचे स्वरुप;  हजारो अकोलेकरांनी ​​​​​​​दिले योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 17:24 IST

अकोला:  मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला आता लोकचळवळीचे स्वरुप मिळाले असून जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आजही हजारो अकोलेकर मोर्णाच्या स्वच्छतेसाठी एकजुटीने नदीकाठी आले होते. 

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी, विदयार्थी, वयोवृध्द नागरिकांनी केली मोर्णाची स्वच्छता. विविध सामजिक संस्था, बचतगटांच्या महिलांचा सहभाग.अत्यंत शांततेत व शिस्तीत पार पाडली मोहिम.

अकोला:  मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला आता लोकचळवळीचे स्वरुप मिळाले असून जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आजही हजारो अकोलेकर मोर्णाच्या स्वच्छतेसाठी एकजुटीने नदीकाठी आले होते.  आपली मोर्णा स्वच्छ झालीच पाहिजे, असा ध्यास घेऊन हजारो लोकांनी आज स्वच्छतेच्या या महायज्ञेत आपला सहभाग नोंदवला.

आज सकाळी ठिक 8.00 वाजता मोर्णाच्या स्वच्छतेला प्रारंभ झाला. गीतानगर भागाला लागून असणाऱ्या मोर्णाच्या पूर्व व पश्चिम भागात आज स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी जेसीबीव्दारे काढण्यात आलेला कचरा  लोकांनी वाहनांमध्ये भरुन दिला. तसेच नदीपात्रात उतरुन शेकडो लोकांनी सांघिकरित्या कचरा बाहेर काढला. या मोहिमेत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, त्यांच्या पत्नी तथा वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राकेश कलासागर, नगरसेवक हरिष अलीमचंदानी,    उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त दिलीप पाटील, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मीर, तहसिलदार  राजेश्वर हांडे,  राहूल तायडे,  एसटीचे विभागीय व्यवस्थापक श्री. पलंगे,  यांच्यासह विदयार्थी, शिक्षक, व्यापारी, बचतगटाच्या महिला, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी/कर्मचारी, पोलीस, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत नागरिक, वयोवृध्द नागरिक, विदयार्थी आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते. केवळ अकोला शहरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातून अनेकजण स्वच्छतेसाठी पुढे आले होते. सुमारे दोन ते अडीच हजार लोकांनी मोर्णाची स्वच्छता केली.

नदीच्या ठिकाणी  सर्वांच्या सुरक्षेबरोबरच स्वच्छते अंतर्गत करावयाच्या बाबींचे परिपूर्ण नियोजन जिल्हा प्रशासन आणि मनपा व पोलीस प्रशासनाने केले होते. त्यामुळे सहभागी सर्वांनीच कुठलीही भीती न बाळगता स्वयंस्फुर्तीने नदी काठावरील कचरा हिरीरीने ट्रॅक्टर  व घंटागाडीत टाकला. मोर्णा स्वच्छ झालीच पाहिजे या भावनेतून सर्वजण मन लावून काम करताना दिसत होते. विशेष म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार  किंवा दुर्घटना न घडता ही मोहिम खूपच शिस्तबध्दपणे व शांततेने पार पडली. मोहिमेकरीता आवश्यक असणारी साधने व साहित्य मनपाकडून पुरविण्यात आले. यावेळी सर्पमित्र पथक, वैदयकीय सहायता पथक, पाणी व्यवस्थापन, साहित्य पुरवठा, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथक नदीकाठी हजर होते. ठेकेदार दीपक कारगल यांनी स्वच्छतेसाठी पोकलेनची सेवा मोफत उपलब्ध करुन दिली.  

मोहिमेत मूर्तिजापूर येथील गाडगे बाबा स्वच्छता मंडळ स्वच्छता अभियान पथक, क्रीडा भारती, तसेच  हॉली क्रॉस शाळा, आरडीजी महिला महाविदयालय, शिवाजी कॉलेज, सीताबाई आर्टस महाविदयालय एलआरटी महाविदयालयाचे  एनसीसीचे विदयार्थी, स्वावलंबी वस्तीस्तर संघ, शौर्य संस्था, आत्मा, व्यापारी, एसटीचे कर्मचारी, जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी,  शिवाजी विदयालयाचे विदयार्थी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य समितीचे सदस्य, पिंजर येथील संत गाडगेबाबा आपतकालीन शोध बचाव पथक, भाग्योदय फांउडेशन, गुरुदेव सेवामंडळ,  महानगर पालिका शिक्षक संघटना, शिवशक्ती महिला बचतगट, दादाजी महिला बचत गट, संतोषीमाता महिला बचत गटाचे सदस्य, पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी, आणि मनपाचे सफाई कर्मचारी  सहभागी झाले होते.

टॅग्स :Akola cityअकोला शहरMorna Swachata Missionमोरणा स्वछता मोहीम