शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोर्णेच्या पात्रात पुन्हा जलकुंभी; डासांची पैदास वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 15:33 IST

मोर्णेच्या पात्रात पुन्हा एकदा जलकुंभी बहरल्याचे चित्र आहे. त्यामुळे डासांची पैदास वाढली असून, नदीकाठच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.

अकोला: मोर्णा नदी स्वच्छता अभियानाचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. नदी पात्रातील जलकुंभी काढण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आला असून, त्याचे परिणाम समोर आले आहेत. मोर्णा नदीची थातूरमातूर पद्धतीने स्वच्छता केल्यामुळे मोर्णेच्या पात्रात पुन्हा एकदा जलकुंभी बहरल्याचे चित्र आहे. त्यामुळे डासांची पैदास वाढली असून, नदीकाठच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. जलकुंभी काढण्यासाठी मनपा प्रशासनाने २० लाखांची तरतूद केली असली, तरी प्रशासनाला कधी मुहूर्त सापडतो, असा प्रश्न अकोलेकर उपस्थित करीत आहेत.कधीकाळी शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या मोर्णा नदीची महापालिकेच्या अनास्थेमुळे पुरती वाट लागली आहे. शहरातील घाण सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी पर्यायी उपाययोजना न करता मनपा प्रशासनाने चक्क मोर्णा नदी पात्राचा वापर केल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात बोटावर मोजता येणारे पूर वगळता मोर्णा नदीच्या पात्रात वर्षभर घाण सांडपाणी तुंबल्याचे दिसून येते. त्यावर निर्माण होणारी जलकुंभी काढण्यासाठी प्रशासनाकडून दरवर्षी ८ ते १० लाख रुपये खर्च केले जातात. गतवर्षी जिल्हा प्रशासनाने स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर मोर्णा नदी स्वच्छता अभियान राबविले. यामध्ये मनपा प्रशासनासह सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी हिरिरीने सहभाग नोंदविला. या कामासाठी नदी पात्रात मनपाच्या मोटर वाहन विभागाची अख्खी यंत्रणा जुंपण्यात आल्याचे चित्र होते. मोर्णा स्वच्छता अभियानला एक वर्षाचा कालावधी उलटून गेला असला तरी अद्यापही नदी पात्रातील घाण सांडपाण्याची समस्या कायमच असल्याची परिस्थिती आहे. आज रोजी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलकुंभी बहरली असून, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.महापौर-आयुक्त साहेब, समस्या निकाली काढा!नदी पात्रातील जलकुंभीमुळे सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने डासांची पैदास वाढली आहे. यामुळे नदीकाठच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले असून, याकडे सत्ताधारी भाजप व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे महापौर व आयुक्त साहेब ही समस्या तातडीने निकाली काढा, असा सूर उमटत आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाMorna Riverमोरणा नदी