शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

‘मोर्णा स्वच्छता मिशन’ : मोर्णा स्वच्छतेसाठी अकोेलेकरांची पुन्हा एकजूट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 14:28 IST

अकोला : जिल्हा प्रशासन आणि विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांच्यावतीने शनिवार, २० जानेवारी दुसऱ्या  टप्प्यात राबविण्यात आलेल्या ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्दे जिल्हा प्रशासन आणि विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांच्यावतीने शनिवार, २० जानेवारी रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २० जानेवारी रोजी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत लक्झरी बस स्टँन्डमागील परिसरात मोर्णा नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

अकोला : जिल्हा प्रशासन आणि विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांच्यावतीने शनिवार, २० जानेवारी दुसऱ्या  टप्प्यात राबविण्यात आलेल्या ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत नदीपात्राच्या दोन्ही काठावर नागरिकांची गर्दी उसळल्याने, मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी अकोलेकरांच्या एकजुटीचा पुन्हा प्रत्यय आला.अकोला शहराचे वैभव असलेल्या मोर्णा नदीपात्रात जलकुंभी मोठ्या प्रमाणात वाढली असून, घाण कचरा साचला आहे. शहरातील सांडपाणी नदीत जात असल्याने, मोर्णा नदीत अस्वच्छता पसरली आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व शहरातील विविध सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना, कर्मचारी संघटनांसह लोकसहभागातून गत १३ जानेवारी रोजी मोर्णा नदी स्वच्छता मोहीमेला प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेला मिळालेला नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघता, मोर्णा नदी स्वच्छ होईपर्यंत स्वच्छता मोहीम सुरुच राहणार असून, दर शनिवारी मोर्णा नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जाहीर केले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासन, शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना व कर्मचारी संघटनांच्यावतीने दुसºया टप्प्यात २० जानेवारी रोजी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत लक्झरी बस स्टँन्डमागील परिसरात मोर्णा नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत मोर्णा नदीतील जलकुंभी, कचरा आणि गाळ काढण्यात आला.

लोकप्रतिनिधी, अधिकाºयांसह नागरिकांचा सहभाग जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, आमदार हरिष पिंपळे, महापौर विजय अग्रवाल, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार राजेश्वर हांडे, नगरसेवक हरिष आलिमचंदाणी, उषा विरक, किरण बोराखडे, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष भडांगे, श्रीराम हेल्थ अ‍ॅन्ड फिटनेस सेंटरचे विक्रम उर्फ छोटू गावंडे, संत निरंकारी सेवा मंडळाचे क्षेत्रीय संचालक शामलाल निरंकारी, संचालिका गीता कटारिया, सामाजिक कार्यकर्ता पराग गवई, ‘एनएसएस ‘चे जिल्हा समन्वयक प्रा.तिडके, डॉ.एम.आर. इंगळे,  सीताबाई कला महाविद्यालयाचे डॉ.प्रसन्नजीत गवई यांच्यासह महसूल मंडळ अधिकारी, तलाठी संघटना, महिला बचत गट,स्वयंसेवी संस्था व विविध सामाजिक संघटना आणि नागरिक सहभागी झाले होते. लोकसहभागातून  दुसºया टप्प्यात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने, मोर्णा नदी स्वच्छतेसाठी पुन्हा अकोलेकरांच्या एकजुटीचा प्रत्यय आला.

टॅग्स :Morna Swachata Missionमोरणा स्वछता मोहीमAkola cityअकोला शहर