शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

मोर्णा स्वच्छता मिशन : नदीपात्राच्या स्वच्छतेसाठी सरसावली अकोल्यातील मातृशक्ती

By atul.jaiswal | Updated: February 1, 2018 17:06 IST

अकोला : शहराचे वैभव असलेल्या मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी सुरु असलेल्या अभियानाला गुरुवार, १ फेब्रुवारी रोजी शहरातील मातृशक्तीचाही हात लागला.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांचा आवाहनाला मातृशक्तीची साद.जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या पत्नी डॉ. मानसा कलासागरसह अधिकाऱ्यांच्या पत्नींचा मोर्णा स्वच्छतेसाठी श्रमदान.सहभागी विद्यार्थीनीच्या हातात बेटी बचाओ , बेटी पढाओ चा संदेश देणारे फलक

अकोला : शहराचे वैभव असलेल्या मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी सुरु असलेल्या अभियानाला गुरुवार, १ फेब्रुवारी रोजी शहरातील मातृशक्तीचाही हात लागला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शालेय विद्यार्थीनी, शासकीय कार्यालयातील महिला कर्मचारी, बचतगट, स्वयंसेवी संस्थांच्या महिलांनी मोर्णा नदीकाठावर येऊन श्रमदान केले.जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मोर्णा स्वच्छतेसाठी मातृशक्तीला आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत गुरुवारी सर्व मातृशक्ती मोर्णा स्वच्छतेसाठी गिता नगर येथील मोर्णा नदीच्या किनाºयावर पोहचली व सर्वांनी सुमारे दोन तास श्रमदान केले. मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी मातृशक्तीचे हजारो हात सरसावले. यामध्ये लहान मुलीपासून सर्र्वांनीसहभाग नोंदवला. यावेळी जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांण्डेय यांच्या सोबत जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या पत्नी डॉ. मानसा कलासागर, प्रेरणा राजेश खवले, निता संजय खडसे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, ज्ञानेश्वरी अशोक अमानकर, राधा रामेश्वर पुरी, योगीता विजय लोखंडे, हर्षदा खेडकर, मनपाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. दिपाली भोसले, महिला विकास आर्थिक महामंडळाच्या व्यवस्थापक वर्षा खोब्रागडे , वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना मेश्राम, डॉ. अनिता विधोळसह महसुल तसेच आरोग्य विभागाच्या महिला कर्मचारी यांनी मोर्णा स्वच्छतेसाठी श्रमदान करून योगदान दिले. आजच्या मोर्णा स्वच्छता मिशन अभियानात उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर , उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी एम. एम. राठोड, तहसिलदार रामेश्वर पुरी, तहसिलदार विजय लोखंडे, औद्योगीक प्रशिक्षण केंद्र मुलींचे प्राचार्य प्रमोद भंडारे आदी उपस्थित होते.या शाळांच्या विद्यार्थीनींनी नोंदविला सहभागआरडीजी महिला महाविद्यालय, मनपा हिंदी शाळा, मनपा मुलींची शाळा, मनपा उर्दु शाळा, प्रभात किडस, मुलींची आय.टी.आय. पुडंलीक बाबा विद्यालय चांदुर, श्रीमती पी.डी. पाटील समाजकार्य महाविद्यालय, महिला विकास आर्थिक महामंडळाचे विविध बचतगट यांच्या सोबत शहरातील महिला स्वयंफुतीर्ने श्रमदानासाठी तसेच आपली मोर्णा नदी स्वच्छ करण्यासाठी सहभागी झाल्या होत्या.जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानापासून काढली रॅलीदर महिन्याच्या १ तारखेला जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांअतर्गत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अंतर्गत १ फेब्रुवारी १०१८ रोजी सकाळी ८.३० वाजता जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यावरून सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांण्डेय, जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या पत्नी डॉ. मानसा कलासागर, प्रेरणा राजेश खवले, निता संजय खडसे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, मुलींची औद्योगीक प्रशिक्षण केंद्र, आर. डी. जी. महिला महाविद्यालय, पंचफूलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय तसेच शासकीय पारिचारीका महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी व आरोग्य विभागाच्या तसेच शासकीय कार्यालयातील महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरMorna Swachata Missionमोरणा स्वछता मोहीम