शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्ह्यांच्या दोनशेपेक्षा अधिक तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 16:59 IST

जानेवारी ते ३० जून या कालावधीत अकोला सायबर सेलकडे २६८ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.

- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मोबाइल, लॅपटॉप तसेच संगणकाच्या युगात सायबर गुन्हेगारीही प्रचंड वाढली असून, आॅनलाइन फसवणूक, बदनामी, तसेच महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी जानेवारी ते ३० जून या कालावधीत अकोला सायबर सेलकडे २६८ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. यामधील बहुतांश तक्रारदारांचे समाधान झाल्याने केवळ १४ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, यापैकी ८ गुन्हे उघडकीस आणत सहा आरोपींना जेरबंद करण्यात अकोला सायबर सेलला यश आले आहे.अकोला सायबर सेलकडे आलेल्या तक्रारींमध्ये अधिक तक्रारी या ओटीपीची मागणी करून बँक खात्यातून पैसे काढणे, आॅनलाइन आमिष देऊन फसवणूक करणे, एटीएम क्लोन करून परस्पर पैसे काढणे, फेसबुक तसेच मेसेंजरच्या माध्यमातून अडचणीत असल्याचे सांगत तसेच मित्राच्याच खात्यावरून पैशाची मागणी केल्याचे गुन्हे अकोला सायबर सेलने दाखल केले आहेत. यासोबतच आॅनलाइन माध्यमातून वाहन खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारातही मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे तक्रारीवरून समोर आले आहे.तर गिफ्ट लागल्याचे आमिष देऊन आणि लोन देण्याच्या आमिषाखालीही अनेकांना लाखो रुपयांनी गंडविल्याचे वास्तव आहे. या भुरट्या चोरांनी आतापर्यंत १५ लाखांपेक्षा अधिक रुपयांनी आॅनलाइन गंडा घातल्याचे वास्तव असून, यामधील केवळ ४ लाख रुपयांची रक्कम गोठवून ती परत करण्यासाठी पूर्ण प्रक्रियेची कामगिरी सायबर सेलने केली आहे.

कोरोनामुळे तपास रखडलेनेट बँकिंग तसेच आॅनलाइन गिफ्ट आणि एटीएमएच्या नावाखाली ओटीपी मागून पैसे गायब करणाऱ्या हॅकरचा शोध लावण्यात सायबर सेलला यश आले आहे; मात्र हे हॅकर्स नोएडा, दिल्ली, राजस्थान आणि पश्चिम बंगाल राज्यातील असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणे कोरोनामुळे शक्य नसल्याने या कालावधील काही प्रकरणांचे तपास रखडल्याची माहिती आहे. सायबर सेलसोबतच स्थानिक गुन्हे शाखेने आयटी अ‍ॅक्ट तसेच सायबर गुन्ह्यांतील आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

फेसबुक-व्हॉट्स अ‍ॅपवर युवतींचा छळफेसबुक तसेच व्हॉट्स अ‍ॅप हे सोशल मीडियाची माध्यमे महिला तसेच युवतींसाठी डोकेदुखी ठरत आहेत. मेसेंजरवर मेसेज करणे, त्यानंतर विविध आमिषे देऊन त्यांचा मोबाइल क्रमांक घेणे आणि युवतींचा छळ करण्याचे प्रकार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यासाठी सायबर सेलकडून वारंवार आवाहन करून आॅनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याच्या सूचना करण्यात येत आहेत; मात्र तरीही बहुतांश युवती व महिला आमिषाला बळी पडत असल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcyber crimeसायबर क्राइम