शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवर पाचपेक्षा अधिक किडींचे आक्रमण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 13:11 IST

या किडींचे व्यवस्थापन करताना शेतमजूर, शेतकऱ्यांना विषबाधांचे प्रकार वाढले आहेत.

अकोला : हवामानात सारखा होत असलेला बदल, पावसाची कमतरता हे प्रतिकूल वातावरण किडींना पोषक ठरत असून, सोयाबीनसह इतर सर्वच पिकांवर किडींनी आक्रमण केले. सोयाबीनवर तर पाच ते सहा अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. या किडींचे व्यवस्थापन करताना शेतमजूर, शेतकऱ्यांना विषबाधांचे प्रकार वाढले आहेत. तसेच शेतकºयांचा कीटकनाशकांच्या नियंत्रणासाठी फवारणीचा खर्च वाढला आहे.यावर्षी सुरुवातीपासूनच पावसात अनियमितता सुरू असून, २३ जून रोजी आल्यांनतर थेट २५ जुलै रोजी पाऊस बरसला. त्यानंतर तुरळक स्वरू पाचा पाऊस अधून-मधून सुरू आहे. मध्येच कमाल तापमान वाढत असून, उन्हाचे चटके, दमट वातावरण तयार होत आहे. हेच वातावरण किडींना पोषक ठरत असल्याने यावर्षी सुरुवातीपासूनच शेतकºयांना कीड व्यवस्थापनावर खर्च करावा लागत आहे. सोयाबीन पिकावर सध्या काळ्या रंगाच्या अळीसह हिरवी उंटवर्गीय अळी, तंबाखूची पाने खाणारी अळी, चक्रभुंगा आदी अळ्या, किडींनी आक्रमण केले आहे.कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असून, ज्यांनी रेफ्युजीची पेरणी केली, तिथे हे प्रमाण सध्या कमी आहे; परंतु ज्या ठिकाणी उपाययोजना केल्या नाहीत, तेथे बोंडअळी वाढण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व कपाशीवर यावर्षीही बोंडअळीने बस्तान मांडल्याने त्या शेतकºयांना चांगलीच दक्षता घ्यावी लागत आहे. हीच अळी नियमित खरीप कपाशीवर येण्याचे प्रकार मागच्या काही वर्षांत घडले. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात ही अळी या कपाशीवर दिसून येते, तेव्हा शेतकºयांना दक्षता घेण्याची गरज आहे.

 सोयाबीन पिकावर चार ते पाच अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या तुलनेत कपाशीवर बोंडअळीचे प्रमाण कमी आहे. असे असले तरी या दोन्ही मुख्य पिकांवरील कीड, अळ्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकºयांनी शेताचे नियमित सर्वेक्षण करू न कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार कीटकनाशके फवारणी करावी.- डॉ. अनिल कोल्हे,मुख्य पीक संरक्षण अधिकारी,कीटकशास्त्र विभाग,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी