शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर तालुक्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस;  उमा, पिंपळशेंडा प्रकल्प 'ओव्हर-फ्लो'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 16:22 IST

मूर्तिजापूर (जि. अकोला ):  तालुक्यात १६ अॉगष्ट पासून सुरु असलेल्या संततधार पावसाने पुर्णा, काटेपूर्णा, उमा आणि कमळगंगा नद्यांना पूर आला असून, दोन उमा आणि पिंपळशेंडा जल प्रकल्पांनी पातळी ओलांडली असल्याने सांडव्यातून विसर्ग होत आहे.

ठळक मुद्दे तालुक्यातील किनखेड येथील ८ ते ९,घरे सांजापूर येथील २ घरे ,सोनेरी येथील १,बपोरी १,राजूरा १,उमरी १ घरांच्या भिंती पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १५६.६७ टक्के पाऊस झाला असून, २४ तासात २९.० मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे.तालुक्यात असलेले उमा व पिंपळशेंडा हे जल प्रकल्प पूर्णत: भरले असल्याने सांडव्यातून १० सेमी. विसर्ग होत आहे.

- संजय उमकमूर्तिजापूर (जि. अकोला ):  तालुक्यात १६ अॉगष्ट पासून सुरु असलेल्या संततधार पावसाने पुर्णा, काटेपूर्णा, उमा आणि कमळगंगा नद्यांना पूर आला असून, दोन उमा आणि पिंपळशेंडा जल प्रकल्पांनी पातळी ओलांडली असल्याने सांडव्यातून विसर्ग होत आहे. नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचे सांगितले आहे. तर १६४० हेक्टरवरील शेती पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक घरांची पडझड झालेल्याने संसार उघडय़ावर आला आहे.पावसामुळे जनजीवनावर अधिक परीणाम झाला आहे.      संततधार सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने घरे पडली आहे.  तर काही गावांचा संपर्क तुटला आहे.   तालुक्यातील किनखेड येथील ८ ते ९,घरे सांजापूर येथील २ घरे ,सोनेरी येथील १,बपोरी १,राजूरा १,उमरी १ घरांच्या भिंती पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. घरांच्या भींती पडल्या तर काही घरे पुर्णत: पडल्याने त्यांची इतरत्र व्यवस्था करण्यात आली आहे.   तालुक्यात आतापर्यंत सरासरी पाऊस झाला आहे. जुन ते सप्टेंबर पर्यंत पावसाची अपेक्षित वार्षीक सरासरी ७४२.८० आहे ही सरासरी अॉगष्ट मध्येच ओलांडून आजपर्यंत सरासरी नुसार ८३०.२ येवढा पाऊस झाला आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १५६.६७ टक्के पाऊस झाला असून, २४ तासात २९.० मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे.     संततधार सुरू असलेल्या पावसाने तालुक्यातील १६४० हेक्टर क्षेत्रावरील पिकाची नासाडी होऊन मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या संबंधीचा अहवाल शनिवारी जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आला. तर पडलेल्या घरांचे सर्वेक्षण चालू आहे.      तालुक्यात असलेले उमा व पिंपळशेंडा हे जल प्रकल्प पूर्णत: भरले असल्याने सांडव्यातून १० सेमी. विसर्ग होत आहे. तर शिवण प्रकल्प ६१.५ टक्के भरला आहे.तालुक्यातील उमा व पिंपळशेंडा हे दोन्ही प्रकल्प शंभर टक्के भरले असून ओव्हरफ्लो झाले आहे तर शिवण प्रकल्प ६१,५ टक्के भरला आहे. उपरोक्त दोन्ही प्रकल्पातून मंगळवार सकाळी १३:३० वाजता पासून १० सेमी. सांडव्यातून विसर्ग होत असल्याने नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा ईशारा देण्यात आला आहे.- प्रदीप पाटीलशाखा अभियंता, उमा प्रकल्प, मूर्तिजापूर.

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरDamधरणmonsoon 2018मान्सून 2018