शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा

By admin | Updated: July 9, 2017 20:16 IST

अकोला : भारिप-बमसंचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची गाडी अडवून दगडफेकीचा प्रयत्न झाला. या भ्याड हल्ल्याचा भारिप-बमसंच्यावतीने रविवारी मोर्चा काढून निषेध करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महू येथील कार्यक्रमादरम्यान भारिप-बमसंचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखविण्यासोबतच दगडफेकीचा प्रयत्न झाला. या भ्याड हल्ल्याचा भारिप-बमसंच्यावतीने रविवारी मोर्चा काढून निषेध करण्यात आला. दोषींवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. देशात लोकशाही आहे. सध्या देशात भारतीय जनता पक्षाकडून विविध षडयंत्रे केली जात आहेत. त्या षडयंत्र करणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या सत्तेकडून पाठबळ दिले जात आहे. त्यामुळे महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीला भेट देण्यासाठी गेलेले त्यांचे नातू अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची गाडी अडवून दगडफेकीचा प्रयत्न झाला. हा प्रकार बौद्ध धर्माची अवहेलना करण्यासारखा आहे. भाजप काळात स्मारक होत असले, तरी ते काही विशिष्ट संघटनांनी काबीज केले आहे, त्यामुळे तेथे काहींची मक्तेदारी तयार होत आहे. त्या ठिकाणी भेट दिली असता हा भ्याड हल्ला झाला आहे. असे प्रकार सुरू राहिल्यास तमाम बौद्ध जनतेसह महू येथे धडक दिली जाणार आहे. लोकशाहीची पायमल्ली करणाऱ्यांना भाजप सत्तेकडून पाठबळ दिले जात आहे, त्यामुळे शासनाचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. अ‍ॅड. आंबेडकर यांना स्वतंत्र सुरक्षा देण्यात यावी, दोषींवर त्वरित कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार बळीराम सिरस्कार, डी.एन. खंडारे, कार्याध्यक्ष काशीराम साबळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमिरउल्लाखा पठाण, सभापती रेखा अंभोरे, दामोदर जगताप, अशोक सिरसाट, वंदना वासनिक, गजानन गवई, महानगर अध्यक्ष बुद्धरत्न इंगोले, सिद्धार्थ सिरसाट, प्रभाताई सिरसाट, विकास सदांशिव, जीवन डिगे, संगीता खंडारे, पुरुषोत्तम वानखडे, कोकिळा वाहुरवाघ, किशोर तेलगोटे, मंतोष मोहोड, सुनीता गजघाटे, रामा तायडे, प्रा. संजय हिवराळे, दिनकर वाघ, श्यामराव वाहुरवाघ, सुभाष रौंदळे, संजय मुळे, शे.साबीर शे.मुसा, आसिफखान, शंकरराव इंगळे, दिलीप माहोड, विजय चक्रे, अशोक दारोकार, देवानंद खडे, नितीन प्रधान, दिनेश मानकर, सोनू गायकवाड, मिलिंद आकोडे व अनुराधा ठाकरे (दोड) उपस्थित होते.