शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मूग, उडीद, सोयाबीन ‘एफएक्यू’च्या निकषात नापास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 01:00 IST

अकोला : हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदी केंद्रात या  धान्याचा दर्जा ‘एफएक्यू’ (सरासरी गुणवत्ता) नसल्याच्या  कारणाने शेकडो नमुने रिजेक्ट केले जात आहेत. त्यामुळे  जिल्हय़ातील चार केंद्रांवर गेल्या पाच दिवसांत मूग ८८ क्विंटल  तर उडिदाची केवळ ३0३ क्विंटल खरेदी झाली आहे.

ठळक मुद्देनमुने ‘रिजेक्ट’ झालेल्या धान्याचे करायचे कायशेतकरी बिथरले

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदी केंद्रात या  धान्याचा दर्जा ‘एफएक्यू’ (सरासरी गुणवत्ता) नसल्याच्या  कारणाने शेकडो नमुने रिजेक्ट केले जात आहेत. त्यामुळे  जिल्हय़ातील चार केंद्रांवर गेल्या पाच दिवसांत मूग ८८ क्विंटल  तर उडिदाची केवळ ३0३ क्विंटल खरेदी झाली आहे. धान्याच्या  दर्जावरून येत्या काळात केंद्रांवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न  निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने खरेदीचा हट्ट न  करता शेतकर्‍यांना पीक पेर्‍यावर अनुदान देण्याची मागणी पुढे ये त आहे.मूग, उडिदासोबतच सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी  जिल्हय़ात चार केंद्र सुरू झाली. त्यासाठी शेतकर्‍यांना आधी  नोंदणी करावी लागत आहे. त्यानंतर उत्पादित धान्याचा नमुना  केंद्रात आणून त्याचा ‘एफएक्यू’ दर्जा तपासला जात आहे.  त्यामध्ये मूग, उडिदाला पांढरे डाग असल्याचे सांगितले जात  आहे. पावसामुळे हा परिणाम झाला आहे, तर सोयाबीनमध्ये  आद्र्रतेचे प्रमाण १२ तब्बल २१ टक्के असल्याने खरेदी न  करण्याचा पवित्रा केंद्रातील संबंधितांनी घेतला आहे. त्यामुळे या  तीनही धान्याचे नमुने खरेदी केंद्राच्या तपासणीत ‘रिजेक्ट’ केले  जात आहेत. सोयाबीनची वाळवण करून आद्र्रतेचे प्रमाण कमी  करता येते. मूग, उडिदासाठी ही सोय नाही. या पिकांची विक्री  कशी करावी, या मुद्यावर आता शेतकरी बिथरले आहेत.  जिल्हय़ात अल्प पावसाचा तर इतरत्र अति पावसाचा फटका  बसल्याने मूग, उडिदाचे पीक राज्यभरात नसल्यासारखेच आहे.  त्यातही जे हातात आले, त्याची खरेदी हमीभावाने होत नाही.  व्यापारी खरेदी करीत नाहीत, त्यामुळे त्या धान्याचे करायचे  काय, असा संतप्त सवालही पुढे येत आहे. 

उशिरा सुरू होऊनही अत्यल्प खरेदीजिल्हय़ात १३ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या केंद्रावर प्रत्यक्ष  खरेदी २४ ऑक्टोबर रोजी झाली. जिल्हय़ातील चारही केंद्रांत  तेव्हापासून आतापर्यंत मूग केवळ ८८ तर उडिदाची खरेदी ३0३  क्विंटल झाली आहे. केंद्रात दररोज ५0 शेतकर्‍यांना बोलावले  जाते, हे विशेष. आकड्यांचा हा खेळ पाहता खरेदीसाठी येणारे  नमुने मोठय़ा प्रमाणात रिजेक्ट होत असल्याचे स्पष्ट होते. 

खरेदी केंद्रात येणारे नमुने ‘एफएक्यू’च्या निकषानुसार तपासले  जातात. त्या निकषाच्या अधीन राहूनच केंद्रात खरेदी करता येते.  शेतकर्‍यांचा त्रास वाचावा, यासाठी आधी नमुना तपासून नंतरच  केंद्रात आणावयास सांगितले जाते. - बजरंग ढाकरे, जिल्हा मार्के टिंग अधिकारी, अकोला. 

टॅग्स :agricultureशेती