शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात शनिवारी पुन्हा मोर्णा नदी स्वच्छता मोहीम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 20:57 IST

अकोला: मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी १३ व २0 जानेवारी रोजी सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकसहभागातून नदीतील कचरा व जलकुंभी मोठय़ा प्रमाणात बाहेर काढण्यात आली; मात्र नदी पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत स्वच्छतेची ही मोहीम सुरूच राहणार असल्याने शनिवार, २७ जानेवारीला सकाळी ठीक ८ वाजता पुन्हा मोर्णा नदी स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे.

ठळक मुद्देसकाळी आठ वाजता होणार प्रारंभनदीकाठी येण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी १३ व २0 जानेवारी रोजी सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकसहभागातून नदीतील कचरा व जलकुंभी मोठय़ा प्रमाणात बाहेर काढण्यात आली; मात्र नदी पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत स्वच्छतेची ही मोहीम सुरूच राहणार असल्याने शनिवार, २७ जानेवारीला सकाळी ठीक ८ वाजता पुन्हा मोर्णा नदी स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. नदीकाठच्या निमवाडी येथील लक्झरी बस स्टँडचा परिसर व नदीकाठच्या गीता नगर येथे सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले आहे.नदीच्या ठिकाणी सर्वांच्या सुरक्षेबरोबरच स्वच्छतेअंतर्गत करावयाच्या बाबींचे परिपूर्ण नियोजन जिल्हा व मनपा प्रशासनाने केले आहे. या मोहिमेसाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवावी. कोणालाही दुखापत होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. कोणालाही प्रत्यक्ष नदीच्या आत जाऊन स्वच्छता करावी लागणार नाही, त्यासाठी अनुभवी कामगारांचे साहाय्य घेतले जाणार आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेने स्वच्छता करावी. स्वच्छतेच्या या महायज्ञात सर्वांनी सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. अकोल्याचे वैभव असणारी मोर्णा नदी जलकुंभी व कचर्‍याने विद्रुप झाल्याने तिच्या स्वच्छतेसाठी जिल्हाधिकार्‍यांनी लोकसहभागातून नदीची स्वच्छता करण्याचे निश्‍चित केल्यानंतर अनेक सामाजिक संस्था, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार आणि नागरिकांनी ही मोहीम यशस्वी करण्याचे ठरविले. दि. १३ व २0 जानेवारी रोजी प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेत लोकप्रतिनिधींसह हजारो लोक सहभागी होऊन नदीच्या स्वच्छतेत सहभाग घेतला. मोहिमेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या मोहिमेमुळे नदीचे रूप पालटून गेले असून, नदी आता वाहताना दिसत आहे. नदीची स्वच्छता अद्याप बाकी असल्याने २७ जानेवारी रोजी पुन्हा एकदा नागरिकांनी स्वच्छता मोहिमेकरिता योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. दर शनिवारी लोकसहभागातून नदी स्वच्छ केली जाईल. नदी पूर्णत: स्वच्छ होईपर्यंत स्वच्छता मोहीम सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Morna Swachata Missionमोरणा स्वछता मोहीमAkola cityअकोला शहरMorna Riverमोरणा नदी