शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बँक खात्यातून पैसे काढणारे रॅकेट सक्रिय! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : येथील जुनी वस्ती रोशनपुरा येथील प्रतिष्ठित नागरिक फिश र्मचंट समीउल्लाखान यांना त्यांच्या मोबाइलवर फोन करून बँक अधिकारी असल्याचे सांगून एटीएम कार्ड व पासवर्ड मागून त्यांच्या खात्यामधील ४0 हजार रुपये लंपास करण्यात आले. ही घटना १ ऑगस्ट रोजी घडली. विशेष म्हणजे मंगळवारी अकोला येथील एका व्यापार्‍याला असाच ...

ठळक मुद्देफिश र्मचंट समीउल्लाखान यांना त्यांच्या मोबाइलवर फोन मागितली माहितीबँक अधिकारी असल्याचे सांगून एटीएम कार्ड व पासवर्ड ची विचारणाखात्यामधील ४0 हजार रुपये लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : येथील जुनी वस्ती रोशनपुरा येथील प्रतिष्ठित नागरिक फिश र्मचंट समीउल्लाखान यांना त्यांच्या मोबाइलवर फोन करून बँक अधिकारी असल्याचे सांगून एटीएम कार्ड व पासवर्ड मागून त्यांच्या खात्यामधील ४0 हजार रुपये लंपास करण्यात आले. ही घटना १ ऑगस्ट रोजी घडली. विशेष म्हणजे मंगळवारी अकोला येथील एका व्यापार्‍याला असाच खोटा कॉल करुन ७0 हजार रुपयाची रक्कम त्याच्या बँक खात्यातून काढल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे अशा प्रकारे खोटे कॉल करुन रक्कम हडपणारे रॅकेट सक्रिय असल्याचे दिसत आहे. फिश र्मचंट समीउल्लाखान यांना अज्ञात भामट्याने निवावी मोबाइल कॉल करून आपण बँक अधिकारी असल्याचे सांगून त्यांचे एटीएम कार्ड काही तांत्रिक अडचणीमुळे रद्द केल्या जात आहे. नवीन एटीएम कार्ड मिळण्यासाठी त्यांचा एटीएम क्रमांक व पासवर्ड मागितला. समीउल्लाखान यांनी १६ अंकी कोड व चार अंकी पासवर्ड देताच मोबाइलवर दुसर्‍या बाजूने असलेल्या व्यक्तीने त्यांचे भारतीय स्टेट बँक शाखा मूर्तिजापूरच्या खात्यातून एका सेकंदात ४0 हजार रुपये काढले. त्यांना त्यांच्या मोबाइलवर खात्यामधून ४0 हजार रुपये काढल्याचा मॅसेज आल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने शहर पोलीस स्टेशन गाठून ठाणेदार गजानन पडघन यांची भेट घेऊन घटनाक्रम कथन केला. ही घटना मंगळवारी घडली. त्यांनी त्याच दिवशी तक्रार दाखल केली. ठाणेदार पडघन यांनी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन घटनेचा तपास त्वरित अकोल्याच्या सायबर सेलकडे वर्ग केला आहे. पुढील तपास सायबर सेल करीत आहे. 

बँक खात्यातून परस्पर ४0 हजार रुपये काढण्याची फिर्याद समीउल्लाखान यांनी दिल्यावरून सदर प्रकरण त्वरित तपासाकरिता सायबर सेलकडे रवाना केले आहे. २४ तासांच्या आत तक्रार सायबर सेलकडे पाठविल्यास पैसे परत मिळण्याची शाश्‍वती अधिक असते.- गजानन पडघनठाणेदार, शहर पोलीस स्टेशन, मूर्तिजापूर.