शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सातव्या वेतनासाठी पैसा, शेतकऱ्यांसाठी नाही हेच दुर्दैव - ज्ञानेश वाकुडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 13:27 IST

अकोला : राष्ट्रसंतांनी ग्रामीण विकासावर भर दिला तर सध्याचे शासनकर्ते शहर विकासावर भर देत आहेत. आम्हाला मेट्रो, स्मार्ट सिटी ...

अकोला: राष्ट्रसंतांनी ग्रामीण विकासावर भर दिला तर सध्याचे शासनकर्ते शहर विकासावर भर देत आहेत. आम्हाला मेट्रो, स्मार्ट सिटी नकोत; त्यापेक्षा शेतकºयांचे कर्ज माफ करा. त्यांच्या शेतमालाला भाव द्या; परंतु या शासनाकडे सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी पैसा आहे, शेतकºयांसाठी नाही. हे दुर्दैव आहे, असा आरोप प्रसिद्ध कवी व लोकजागर अभियानाचे ज्ञानेश वाकुडकर यांनी येथे केला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीतर्फे स्वराज्य भवन प्रांगणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव शुक्रवारपासून सुरू झाला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी राष्ट्रसंतांच्या अधिष्ठानाचे व प्रतिमेचे पूजन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. नितीन बाठे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. बबनराव चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज, महादेवराव भुईभार, अ‍ॅड. रामसिंग राजपूत, गुलाबराव महाराज, तिमांडे महाराज, मधुकरराव सरप, कृष्णा अंधारे, रवींद्र मुंडगावकर, शिवप्रकाश रुहाटिया, सावळे गुरुजी, सचिन महल्ले, अ‍ॅड. वंदन कोहाडे, अ‍ॅड. श्रीदेवी साबळे, प्रा. डॉ. ममता इंगोले आदी उपस्थित होते.ज्ञानेश वाकुडकर म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी राज्यघटना लिहिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दूरदृष्टीने गावाच्या, शेतकºयांच्या, समाजाच्या कल्याणासाठी समाजघटना म्हणजे ग्रामगीता लिहिली. गीतेपेक्षाही ग्रामगीता महत्त्वाची आहे. गाव हा विश्वाचा नकाशा... गावावरून देशाची परीक्षा...असे राष्ट्रसंतांनी म्हटले आहे; परंतु शासनकर्ते त्याउलट काम करीत आहेत. सध्या देशातील परिस्थिती गंभीर आहे. ७0 टक्के जनता खेड्यात राहते. आर्थिक व्यवस्था शेतीवर अवलंबून असतानाही शासन गावांकडे दुर्लक्ष करते. शेतकºयांवर आत्महत्या करण्याची वेळ का आली,असे सांगत वाकुडकर म्हणाले की, शेतकºयांची कर्जमाफी, शेतमालाला भाव देण्यापेक्षा शासनाला सातवा वेतन आयोग लागू करणे महत्त्वाचे वाटते. यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते असू शकते. समाजाने जागरूक होऊन राष्ट्रसंताच्या विचारांनुसार अनुकरण केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.प्रास्ताविक सेवा समितीचे अध्यक्ष बलदेवराव पाटील यांनी केले. मान्यवरांचे स्वागत शेख रऊफ गुरुजी, गजानन काकड, रामरतन घावट, डॉ. अशोक रत्नपारखी, डॉ. त्र्यंबक आखरे, सुभाष भिसे, मधुकर आखरे, धनंजय ढोरे, मुकेश वाकोडे, खानझोडे, प्रांजली गीते, कोमल हरणे, अ‍ॅड. संतोष भोरे, शुभम वरणकार, सुरेश राऊत, गजानन म्हैसने यांनी केले. संचालन शिवाजी म्हैसने यांनी केले.घराघरांत ग्रामगीतेची गरज- सत्यपाल महाराजसध्याचा जमाना ‘बोले तैसा चाले’चा नाही. साºया चोरांचा भरणा आहे. लोकं कीर्तनाला येत नाहीत. त्यासाठी भंडारा ठेवावा लागतो. दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती करणाºया बुवा, महाराजांच्या नादी लोकं लागतात; परंतु राष्ट्रसंतांचे विचार ऐकण्यासाठी कोणी येत नाही. देहाची तिजोरी, दारू त्यात ठेवा...उघड बार देवा आता...अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे चांगला विचार, आचार आणि संस्कार रुजविण्यासाठी घराघरांत ग्रामगीतेची गरज असल्याचे सांगत, सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराजांनी, शासकीय कर्मचाºयांसाठी शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला. चांगली गोष्ट आहे; परंतु शेतकºयांसाठीसुद्धा शासनाने ठोस धोरण हाती घेण्याची गरज आहे, असे मत मांडले.राष्ट्रसंतांचे विचार क्रांतिकारक - प्रा. बाठेराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्वच बाबींचा अंतर्भाव करून ग्रामगीतेची निर्मिती केली. ग्रामगीतेत सांगितलेले त्यांचे विचार क्रांती निर्माण करणारे आहेत. त्यांच्या भजनांनी चीन, पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात देशवासीयांमध्ये चेतना, देशभक्ती जागविण्याचे काम केले, असे सांगत महोत्सवाचे स्वागताध्यक्ष प्रा. नितीन बाठे यांनी, ग्रामगीतेमध्ये ग्रामविकास, कृषी, शिक्षण आणि युवकांच्या विकासाचा मंत्र दिला. ग्रामगीतेचा विचार आत्मसात करण्याची खरी गरज सध्याच्या परिस्थिती असल्याचे त्यांनी स्वागतपर भाषणात सांगितले.

डॉ. नानासाहेब चौधरी यांना जीवनकार्य गौरव पुरस्कार प्रदानराष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समिती व कालुराम रुहाटिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे यंदा प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र उपाख्य नानासाहेब चौधरी यांना मान्यवरांच्या हस्ते जीवनकार्य गौरव पुरस्कार व मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शिवप्रकाश रुहाटिया, श्रीप्रकाश रुहाटिया उपस्थित होते. मानपत्राचे वाचन अ‍ॅड. संतोष भोरे यांनी केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज