शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पैशाचा वाद; युवकाला मारहाण करून शेतात फेकले

By आशीष गावंडे | Updated: April 4, 2024 21:16 IST

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; शिवापूर येथील घटना

अकोला: पैशाच्या कारणावरून एका ३२ वर्षीय युवकाला मारहाण करीत त्याला शिवापूर भागातील शेतात फेकून दिले. या मारहाणाीत युवक गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी खदान पाेलिस ठाण्यात तिघांविरुद्ध अॅट्रासिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रल्हाद दयाराम ढोरे, ऋषिकेश प्रल्हाद ढोरे व अविनाश साहेबराव पातोंडे असे आरोपींची नावे आहेत. तर मंगेश वामन दामोधर असे जखमी युवकाचे नाव आहे.

जखमी अवस्थेत मंगेश दामाेधर याने रुग्णालयातून पोलिसांना बयान दिले. त्यात म्हटले की, 'त्याच्या आईने सन २०१३ मध्ये म्हाडा कॉलनी खडकी येथील प्लॉटचा गोविंदराव सिरसाट यांच्यासाेबत व्यवहार केला हाेता. या व्यवहारात प्रल्हाद ढोरे यांचा समावेश होता. मंगेश हा ढोरेच्या घरातील व शेतातील कामे करायचा. ८ मार्च रोजी दुपारी मंगेश हा प्रल्हाद ढाेरेच्या घरी गेला व प्लॉटच्या व्यवहारातील पैशांपैकी दोन हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा ढाेरे याने तुमचा व्यवहार हा माझ्यासोबत नसून गोविंदराव सिरसाट यांच्यासोबत आहे. तुमचे तुम्ही पाहून घ्या, असे म्हटले, त्यानंतर प्रल्हाद ढोरेचा मुलगा ऋषिकेश याने पुन्हा आमच्याकडे दिसला तर हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिल्याचे बयाणात नमुद आहे.

मारहाण केली अन् फेकून दिलेढाेरे यांच्या घरी वाद झाल्यानंतर मंगेश घरी आला असता लगेच प्रल्हाद दयाराम ढोरे, ऋषिकेश प्रल्हाद ढोरे व अविनाश साहेबराव पातोंडे यांनी मंगेशला मारहाण केली. वाहनात काेंबून शेत शिवारात घेऊन गेल्यानंतर मारहाण केली व फेकून दिल्याचे तक्रारीत नमुद आहे. या मारहाणीत मंगेशचे हातापायांचे हाड मोडले असून त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरु आहेत. खदान पोलिसांनी नागपुर येथे जावून रुग्णालयात मंगेशचे बयाण नोंदवल्यानंतर उपराेक्त तीनही आराेपींविराेधात भादंविचे कलम व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, या गंभीर प्रकरणी खदान पाेलिस स्टेशनचे ठाणेदार धनंजय सायरे यांच्यासाेबत भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी