शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी हल्ल्याचे ‘मॉक ड्रील’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 11:13 IST

पोलिसांकडून काही क्षणातच हे मॉक ड्रील असल्याचे जाहीर केल्यानंतर अनेक जण सुटकेचा निश्वास टाकतात.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यासमोरील आकाशवाणी केंद्रात पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यासह पोलीस अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची वाहने मोठ्या वेगात येतात आणि आकाशवाणी केंद्रावर सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार करतात. हे पोलिसांचे मॉक ड्रील असले तरी एकाचवेळी पोलिसांची अनेक वाहने शहरात दाखल झाल्याने मोठी घटना घडल्याची चर्चा अन् अफवा होते; मात्र पोलिसांकडून काही क्षणातच हे मॉक ड्रील असल्याचे जाहीर केल्यानंतर अनेक जण सुटकेचा निश्वास टाकतात.आकाशवाणी केंद्रामध्ये दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आकाशवाणी केंद्राला घेराव घालतात आणि पोलिसांचे पथक कार्यालयातील सहा अतिरेक्यांना ठार करते. गणेशोत्सव आणि मोहोरमच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने गुरुवारी दुपारच्या सुमारास सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनसमोरील आकाशवाणी केंद्रात दहशतवाद्यांचा खात्मा कशा प्रकारे केल्या जातो, यासंदर्भात मॉक ड्रील केले. आकाशवाणी केंद्रात दहशतवादी घुसले असून, त्यांनी संपूर्ण आकाशवाणी केंद्र हॉयजॅक केल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. नियंत्रण कक्षाकडून स्थानिक पोलीस स्टेशन, अग्निशमन दल, अ‍ॅम्बुलन्स, शिघ्रकृतीदल, बॉम्बशोधक व नाशक पथकास ही माहिती देण्यात आली. काही वेळात पोलीस अधीक्षक जी श्रीधर, पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व पोलीस स्टेशनचे अधिकारी व इतर यंत्रणा त्वरित आकाशवाणी केंद्रासमोर दाखल झाली.दहशतवादी असलेल्या आकाशवाणीचा परिसर पोलिसांनी दोरी लावून निर्मनुष्य केला. संपूर्ण घटना पाहताना परिसरातील समस्त नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला, त्यातच पोलिसांनी एक एक करून चार दहशतवाद्यांना ठार केले. हा सर्व प्रकार सुरू असताना नागरिकांना काहीच कळेनासे झाले; मात्र पोलिसांनी मॉक ड्रिल पूर्ण झाल्यानंतर मॉकड्रिल असल्याचे जाहीर केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. तब्बल अर्धातास हे मॉक ड्रिल सुरू होते.अकोला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात हे मॉक ड्रील करण्यात आले असून, जिल्ह्यात कुठेही दहशतवादी हल्ला झाल्यास त्याला उत्तर देण्यासाठी पोलीस तयार असल्याचे या माध्यमातून दाखविण्यात आले.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस