चार दिवसांपूर्वी न्यू राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी शेरू मिश्रा यांच्या निवासस्थानी मध्यरात्री उशिरा अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला होता; मात्र तेवढ्यात मिश्रा यांच्या आईला जाग आल्याने त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे चोरट्यांनी हातात सापडलेला मोबाइल घेऊन पळ काढला होता. यावेळी शेरू मिश्रा यांच्यासह त्यांच्या मित्रांनी चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले होते. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास सुरू केला असता शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाला मिळालेल्या माहितीवरून त्यांनी खदान परिसरातील महात्मा फुलेनगर येथील रहिवासी दिनेश वासुदेव भारसाकळे यास संशयावरून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता आरोपीने मोबाइल चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यास अटक करून कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
मध्यरात्री मोबाइल पळविणारा चोरटा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:16 IST