शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

अकोला जिल्हयात फिरत्या  लोक न्यायालयाचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 12:27 IST

अकोला जिल्ह्यात १ ते २९ सप्टेंबर दरम्यान फिरते लोक न्यायालय राहणार असून या न्यायालयाचे उदघाटन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्याहस्ते शनिवारी करण्यात आले.

ठळक मुद्देफिरत्या लोक न्यायालयामध्ये दाखलपूर्व, प्रलंबित प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहे. धनादेश अनादर, फौजदारी प्रकरण, अपघात प्रकरण, महसूल व दिवानी प्रकरणांचा तडजोड करून निपटारा करण्यात येणार आहे.

अकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या विधी सेवा उप-समितीच्या निर्देशानुसार अकोला जिल्ह्यात १ ते २९ सप्टेंबर दरम्यान फिरते लोक न्यायालय राहणार असून या न्यायालयाचे उदघाटन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्याहस्ते शनिवारी करण्यात आले.फिरत्या लोक न्यायालयामध्ये दाखलपूर्व, प्रलंबित प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहे. यामध्ये धनादेश अनादर, फौजदारी प्रकरण, अपघात प्रकरण, महसूल व दिवानी प्रकरणांचा तडजोड करून निपटारा करण्यात येणार आहे. फिरत्या न्यायालयाचे उद्घाटनप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, सचिव पी. एस. पोळ, एस. एस. हीरुरकर, बार असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र शाह, इलीयास शेखानी उपस्थित होते. ज्या नागरिकांची प्रलंबित प्रकरणे आहेत, त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.लोक न्यायालयाचा तालुकानिहाय कार्यक्रमअकोला तालुका - १ सप्टेंबर बोरगाव मंजू, २ सप्टेंबर हुतात्मा स्मारक नेहरू पार्कजवळ अकोला, ३ सप्टेंबर गांधी जवाहर बाग, ४ सप्टेंबर गुलाम नबी आझाद सभागृह न्यू ईरा हायस्कूलजवळ, ५ सप्टेंबर ललित कला भवन डाबकी रोड अकोट तालुका - ६ सप्टेंबर चोहोट्टा बाजार, ७ सप्टेंबर मुंडगाव, ८ सप्टेंबर अकोट न्यायालय परिसर, ९ सप्टेंबर अकोलखेड. तेल्हारा तालुका - १० सप्टेंबर दानापूर, ११ सप्टेंबर अडसुळ, १२ सप्टेंबर हिवरखेड, १३ सप्टेंबर तेल्हारा, बाळापूर तालुका - १४ सप्टेंबर पारस, १५ सप्टेंबर बाळापूर, १६ सप्टेंबर वाडेगाव, १७ सप्टेंबर उरळ, पातूर तालुका - १८ सप्टेंबर आलेगाव, १९ सप्टेंबर खेट्री, २० सप्टेंबर चान्नी, २१ सप्टेंबर शिर्ला, बार्शीटाकळी तालुका - २२ सप्टेंबर बार्शीटाकळी, २३ सप्टेंबर कान्हेरी, २४ सप्टेंबर पिंजर, २५ सप्टेंबर महान, मूर्तिजापूर तालुका - २६ सप्टेंबर माना, २७ सप्टेंबर कुरुम, २८ सप्टेंबर मूर्तिजापूर आणि २९ सप्टेंबर हातगाव.

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय