शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल कंपनीने जमा केले २४ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 10:56 IST

नधिकृत भूमिगत फायबर आॅप्टिक केबलचे जाळे विणणाऱ्या एका बडया मोबाईल कंपनीने अखेर उशिरा का होईना दंडात्मक रकमेपोटी मनपाकडे शुक्रवारी २४ कोटी ८ लक्ष रुपये जमा केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिकेचे नियम पायदळी तुडवित फोर- जी सुविधेच्या नावाखाली संपूर्ण शहरात अनधिकृत भूमिगत फायबर आॅप्टिक केबलचे जाळे विणणाऱ्या एका बडया मोबाईल कंपनीने अखेर उशिरा का होईना दंडात्मक रकमेपोटी मनपाकडे शुक्रवारी २४ कोटी ८ लक्ष रुपये जमा केले. ‘लोकमत’ने हे प्रकरण उघडकीस आणले होते व या प्रकरणाचा सातत्याने वस्तुनिष्ठ पाठपुरावा केला हे येथे उल्लेखनिय.शहरात भूमिगत फायबर आॅप्टिक केबल टाकण्यासाठी महापालिकेची परवानगी क्रमप्राप्त आहे. मनपाच्या परवानगीला ठेंगा दाखवत तसेच कोट्यवधी रुपयांचा रिस्टोरेशन चार्ज (दुरुस्ती खर्च) जमा न करता एका बडया मोबाईल कंपनीन शहराच्या विविध भागात खोदकाम करून अनधिकृत केबल व ‘डक’चे जाळे निर्माण केले. माजी महापौर विजय अग्रवाल तसेच विद्यमान महापौर अर्चना मसने यांच्या प्रभागात कंपनीकडून फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकल्या जात असल्याचा प्रकार सर्वप्रथम ‘लोकमत’ने १६ डिसेंबर २०१९ रोजी चव्हाट्यावर आणला होता. दूरसंचार व प्रसारण केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी ही बाब गंभीरतेने घेत याप्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांना दिले होते. मोबाइल कंपनीच्या ‘आरओडब्ल्यू’चे राज्य उपाध्यक्ष राजीव अमीडवार तसेच आयुक्त संजय कापडणीस यांच्यात बैठका पार पडल्यानंतरही अनधिकृत केबल टाकलेच नसल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात होता.

कंपनी वठणीवर आलीच!मोबाईल कंपनीचे अधिकारी जुमानत नसल्याचे पाहून मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी अनधिकृत केबलच्या तपासणीचे निर्देश दिले असता तपासणीत चक्क ६४ किमी लांबीची केबल सापडल्याचा दावा बांधकाम विभागाने केला होता.

यावर आक्षेप घेत कंपनीने संयुक्त तपासणीची मागणी केली असता, प्रशासनाने २२ जूनपासून संयुक्त तपासणीला प्रारंभ केला. यामध्ये जुलै महिन्याच्या अखेरीस कंपनीचे ३९ किमी अंतराचे अनधिकृत केबल आढळून आल्यानंतर कंपनीने अनधिकृत केबल टाकल्याची बाब मान्य केली.

शहरात अनधिकृत केबल टाकल्याची बाब मोबाईल कंपनी मान्य करीत नसल्याने ते सिद्ध करण्याचे मनपासमोर आव्हान होते. प्रशासनाच्या अपरोक्ष अनधिकृत केबल टाकल्या जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणला. २४ कोटींमुळे मनपाला मोठा दिलासा मिळाला आहे. यामध्ये ‘लोकमत’चा सिंहाचा वाटा असून, आम्ही आभारी आहोत.-संजय कापडणीस, आयुक्त मनपा.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका