शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

एसटीमध्ये जागा आरक्षित करण्यासाठी आता मोबाइल अँप!

By admin | Updated: September 26, 2016 03:13 IST

टेक्नोसॅव्ही दिशेने राज्य परिवहन महामंडळाची वाटचाल.

राम देशपांडे अकोला, दि. २५- प्रवासाला निघण्यापूर्वी जागा आरक्षित करणार्‍या प्रवाशांकरिता एसटी महामंडळाने 'एमएसआरटीसी मोबाइल रिझर्व्हेशन' हे अँड्रॉइड प्रणालीवर आधारित मोबाइल अँप सुरू केले आहे. स्पर्धेच्या या युगात टिकून राहण्यासाठी, खर्‍या अर्थाने आता एसटी महामंडळाने टेक्नोसॅव्ही दिशेने वाटचाल सुरू केली आहे.बसायला जागा मिळत नसली, तरी मनात तोच विश्‍वास कायम ठेवत हजारो प्रवासी आजही एसटीच्या प्रवासालाच प्राधान्य देतात. जनतेचा हा विश्‍वास सदैव अबाधित राहावा, याकरिता एसटी महामंळाने प्रवाशांना पुरविल्या जाणार्‍या सेवा सुविधांमध्ये बदलण्यास प्रारंभ केला आहे. काळानुरूप नव्या कल्पना मांडल्या जात असून, एसटी सेवा बदलण्याचे प्रयत्न होत आहेत. प्रवासाला निघण्यापूर्वी बसमध्ये जागा आरक्षित करणार्‍या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने ह्यएमएसआरटीसी मोबाइल रिझर्व्हेशनह्ण या नावाने अँड्रॉइड प्रणालीवर आधारित मोबाइल अँप सेवा सुरू केली आहे. ह्यट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चरह्ण या कंपनीने विकसित केलेले हे अँप गूगल प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. युजर फ्रेंडली असलेल्या या अँपच्या वापरकर्त्यास सर्वप्रथम स्वत:ची संपूर्ण माहिती देऊन स्वतंत्र खाते तयार करावे लागेल. ज्या-ज्या ठिकाणी एसटी महामंडळाची बस जाते, त्या सर्व शहरांचा व गावांचा अंतर्भाव या अँपमध्ये करण्यात आला आहे. इच्छित स्थळी जाण्यासाठी सेमी लक्झरी, अँशियाड, ऑडनरी, शिवनेरी व रातराणी अशा सर्व प्रकारच्या गाड्या आणि त्यांच्या वेळा या अँपमध्ये पाहता येत असल्याने, सोईस्कर बसमधील जागा या अँपच्या माध्यमातून आरक्षित करता येते. चार्टवर दर्शविलेल्या आसनांवर बोटाने स्पर्श करताच हिरव्या रंगांत बदलतात व ती आरक्षित करतात येतात. यामध्ये रंग पांढर्‍या रंगाची आसने अनारक्षित असल्याचे दर्शवितात, तर करड्या रंगाची आसने बुक असल्याचे दर्शवितात. महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेली आसने अनुक्रमे जांभळय़ा व फिकट शेंदरी रंगाने दर्शविण्यात आली आहेत. पूर्णत: आरक्षित झालेल्या असनांचा रंग लाल झालेला दिसून येतो. प्रवास भाडे किती लागणार, याची माहितीदेखील खालीच मिळते. यामध्ये सवलतींचा लाभ घेणार्‍या प्रवाशांना स्वत:च्या ओळखपत्राचा पुरावा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अँपद्वारे जागा आरक्षित करताना कार्ड, नेटबँकिंग आणि वॉलेट असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. आधुनिकतेकडे वाटचाल करणार्‍या एसटी महामंडळाने तळहातावर उपलब्ध केलेली ही सुविधा प्रवाशांना आकर्षित करीत आहे.