शहरं
Join us  
Trending Stories
1
Smriti Mandhana Wedding Postponed : स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली! लग्न पुढे ढकलले
2
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
3
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
4
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
5
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
6
'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
7
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
8
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!
9
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
10
'पुण्याला जातो' सांगून गेलेल्या अंडर-१६ खेळाडूचा जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलमुळे पटली ओळख!
11
सौदी अरेबियात ३१ हजार जागांसह तब्बल ९१ हजार नोकऱ्या; मुख्य नोकरीसोबत सेवा करण्याची संधी
12
हार्दिक पांड्याने खरंच माहिका शर्मासोबत साखरपुडा केला? पूजाविधी करणारे पंडितजी म्हणाले...
13
आलिशान कार, गर्लफ्रेंड, चोरी, नाकाबंदी... नर्सिंगची विद्यार्थिनी बनली बॉयफ्रेंडची क्राइम पार्टनर
14
Pune Video: "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा
15
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
16
५० लाखांचे घर घ्यायचे की १ कोटीचे? '५-२०-३-४०' हा एक फॉर्म्युला देईल अचूक उत्तर!
17
IND vs SA : मुथुसामीची 'आउट ऑफ सिलॅबस सेंच्युरी'! मोर्कोसह पहिल्या डावात द.आफ्रिकेनं साधला मोठा डाव
18
शेअर बाजारात पैशांचा पाऊस! टॉप १० पैकी ७ कंपन्यांना १.२८ लाख कोटींचा फायदा; सर्वाधिक कमाई कोणाची?
19
VIDEO : "मजाक बना रखा है टेस्ट क्रिकेट को..." अंपायरनं घड्याळ दाखवलं; मग कुलदीपवर भडकला पंत
20
बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलासाठी रोहयो मजुरीचे ५५ कोटी बुडाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 11:00 IST

जिल्ह्यातील किमान ३० हजार लाभार्थींच्या रोहयो मजुरीचे ५४ कोटी ६० लाख रुपये गेल्या तीन वर्षात बुडाल्याची धक्कादायक माहिती आहे.

- सदानंद सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थींना रोजगार हमी योजनेतून ९० दिवसांच्या मजुरीपोटी १६ ते १८ हजार रुपये रक्कम देण्याची तरतूद आहे. त्या मजुरीसाठी लाभार्थींना कमालीचे वेठिस धरण्याचा प्रकार पंचायत समित्यांमधील रोहयो कक्ष, ग्रामस्तरावर ग्रामरोजगार सेवकांनी केला. त्यामुळे जिल्ह्यातील किमान ३० हजार लाभार्थींच्या रोहयो मजुरीचे ५४ कोटी ६० लाख रुपये गेल्या तीन वर्षात बुडाल्याची धक्कादायक माहिती आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या प्रकरणाची चौकशी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड यांच्याकडे दिली. त्यांनी सातही गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस देत २०१४ पासून मजुरीचे मस्टर न काढलेल्या घरकुलांची माहिती व खुलासा मागवला आहे.रोजगार हमी योजना कायद्यातील तरतुदीनुसार मजुरीचे देयक काढण्याची प्रक्रिया ठरली आहे; मात्र ग्रामरोजगार सेवक, पंचायत समित्यांमधील रोजगार हमी योजनेतील संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांना पैसे न मिळाल्यास मस्टरची रक्कम लाभार्थींना मिळणारच नाही, अशीच व्यवस्था केली जाते. त्याचा फटका जिल्ह्यातील ३०३३५ पेक्षाही अधिक लाभार्थींना बसला आहे. मजुरीच्या रकमेनुसार जिल्ह्यातील लाभार्थींची किमान ५४ कोटी ६० लाख ३० हजार रुपये एवढी रक्कम बुडाल्याची प्रथमदर्शी माहिती आहे. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोहाड यांनी माहिती मागवली. त्यासोबतच २०१४ पासून लाभार्थ्यांना मजुरी का दिल्या गेली नाही, याचा खुलासाही नोटीसद्वारे मागवला.येत्या २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणताना कमालीच्या अडचणी शासनाकडूनच उभ्या करण्यात आल्या. घरकुल लाभार्थींना मजुरीची रक्कम म्हणून १६ ते १८ हजार रुपये मस्टरद्वारे देण्यासाठी मस्टर भरावे लागते. ते काम ग्रामरोजगार सेवकांकडून केले जाते. पंचायत समितीमधील कंत्राटी असलेल्या अधिकारी-कर्मचाºयांच्या मंजुरीनंतरच संबंधित मजुरांच्या खात्यात आॅनलाइन जमा केली जाते; मात्र त्यासाठी लाभार्थींनी ग्रामरोजगार सेवकाला पैसे न दिल्यास ती रक्कम त्यांना मिळणारच नाही, अशीच व्यवस्था आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो लाभार्थींना मजुरीची रक्कम मिळालीच नसल्याची बाब खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या निदर्शनास आली. त्यामुळेच चौकशी होत आहे.प्रकल्प संचालकांनाही नोटीसघरकुल लाभार्थ्यांना २०१४ पासून मजुरीची रक्कम दिली जात नाही, याकडे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांचेही कमालीचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे त्यांच्यासह सातही गटविकास अधिकाºयांना नोटीस बजावण्यात आल्या.

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना