लोकमत न्यूज नेटवर्कचोहोट्टा बाजार : संततधार पावसाचे पाणी घरात शिरल्याने करोडी येथे अनेक घरांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त घरांची आमदार रणधीर सावरकर यांनी ३१ ऑगस्ट रोजी पाहणी केली, तसेच शॉक लागून मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. दोन दिवसाआधी या परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे करोडी येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. यादरम्यान विजेचा शॉक लागून किशोर वासुदेव खुळे या १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. नुकसानग्रस्त घरांची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. या घटनेची आमदार रणधीर सावरकर यांनी तत्काळ दखल घेत गुरुवारी नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. धारेल येथे आत्महत्या केलेल्या पुरुषोत्तम गव्हाळे व टाकळी येथील पिंटू खोटरे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच प्रतिष्ठित व्यापारी राजकुमार अग्रवाल यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांचीही आमदार सावरकर यांनी भेट घेतली. यावेळी मधुकर पाटकर, विवेक भरणे, दत्तू गावंडे, दिलीप वडाळ, सतीश धुमाळे, नीलेश मानकर, अतुल नवत्रे, गजानन गेंद, मंगेश धुले, अतुल धुमाळे, श्याम अग्रवाल, सुनील वहिले, नितीन खोटरे, नीलेश खोटरे आदी उपस्थित होते.
नुकसानग्रस्त घरांची आमदारांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:54 IST
चोहोट्टा बाजार : संततधार पावसाचे पाणी घरात शिरल्याने करोडी येथे अनेक घरांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त घरांची आमदार रणधीर सावरकर यांनी ३१ ऑगस्ट रोजी पाहणी केली, तसेच शॉक लागून मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
नुकसानग्रस्त घरांची आमदारांनी केली पाहणी
ठळक मुद्देकरोडी येथील मृताच्या कुटुंबीयाचे केले सांत्वन!विजेचा शॉक लागून किशोर वासुदेव खुळे या १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता