शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

‘पोकरा’तून आमदार रणधीर सावरकर यांचे सदस्यत्व रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 14:12 IST

अशासकीय समितीमधून आमदार रणधीर सावरकर व विनायक मेटे यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

अकोला : नानाजी देशमुख (पोकरा) कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अशासकीय समितीमधून आमदार रणधीर सावरकरविनायक मेटे यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. तद्वतच शेततळे व शेळीपालन योजनाही स्थगित ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, यासंबंधीचे परिपत्रक काढण्यात आले आहे.राज्यातील १५ जिल्ह्यांतील ५,१४२ गावांमध्ये पोकरा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी जागतिक बँकेने ४ हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले आहे. २०२३-२४ पर्यंत शेतकरी उत्थानासाठी राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पांतर्गत मराठवाडा व विदर्भातील गावांची निवड करण्यासाठी शासनाने सात सदस्यीय समिती गठित केली होती. तसेच १५ सदस्य असलेली तांत्रिक सल्लागार समितीही गठित करण्यात आली होती. गाव निवड समितीवर आमदार रणधीर सावरकर तर तांत्रिक सल्लागार समितीवर आमदार विनायक मेटे यांचा अशासकीय सदस्य म्हणून शासनाने समावेश केला होता.आता गाव निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने निवड समितीचे औचित्य राहिले नसल्याने आमदार सावरकर यांचे समितीतील अशासकीय सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच विनायक मेटे यांचेही सदस्यत्व शासनाने रद्द केले आहे. २५ फेब्रुवारी रोजी काढलेल्या परिपत्रकात हे नमूद केले आहे.दरम्यान, पोकरा अंतर्गत खासगी जमिनीवर राबविण्यात येणारा सामुदायिक शेततळे प्रकल्प २६ फेब्रुवारीपासून बंद करण्यात आला असून, शेळीपालनाबाबत स्वतंत्र मार्गदर्शक सूचना देण्यात येणार आहेत. तोपर्यंत शेळीपालन योजनेची अंमलबजावणी थांबविण्यात आली आहे. तथापि, २६ फेब्रुवारीपूर्वी पूर्वसंमती घेतलेल्या लाभार्थींना शेततळयांचे देय अनुदान देण्यात येणार आहे. तसेच पाइप, पंप संच, यांत्रिकीकरण व नवीन विहिरी या चार घटकांसाठी यापूर्वी वाटप केलेल्या आर्थिक लक्ष्यांकानुसार त्यासोबतच दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाRandhir Savarkarरणधीर सावरकरVinayak Meteविनायक मेटे