शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

'मिशन बिगीन अगेन' : सम, विषम नियमाचा पहिल्याच दिवशी फज्जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 10:17 AM

शुक्रवारी पहिल्याच दिवशी ‘पी वन-पी टू’ या नियमाचा फज्जा उडाल्याचे चित्र होते.

ठळक मुद्देशहरात सम आणि विषम पद्धतीने दुकाने उघडण्यास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्देश दिलेकिराणा दुकानदार, होलसेल किराणा व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम कायमच होता. शहरातील सर्वच रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुकाने उघडी होती.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्य शासनाने लॉकडाउनचे नियम शिथिल करून सुरू केलेल्या मिशन बिगीन अगेनच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वच दुकाने सुरू करण्याची मुभा दिली; परंतु कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, स्थानिक प्रशासनाला काही अधिकार दिले आहेत. त्यानुसार अकोला शहरात सम आणि विषम पद्धतीने (पी वन-पी टू) दुकाने उघडण्यास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्देश दिले होते. या निर्देशानुसार महापालिकने नियोजनही केले; मात्र शुक्रवारी पहिल्याच दिवशी ‘पी वन-पी टू’ या नियमाचा फज्जा उडाल्याचे चित्र होते.शुक्रवारपासून बाजारपेठेतील रस्त्याच्या एका बाजूस असलेली दुकाने सम तारखेस व दुसºया बाजूला असलेली दुकाने विषम तारखेस सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी दिली आहे; परंतु ‘पी वन-पी टू’बाबत किराणा दुकानदार, होलसेल किराणा व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम कायमच होता. तो शुक्रवारी पहिल्याच दिवशी प्रत्यक्षात दिसला. शहरातील सर्वच रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुकाने उघडी होती.७३ दिवसांनंतर गजबजली बाजारपेठकोरोनाचे संकट संपलेले नसतानाच कोरोनाच्या छायेत तब्बल ७३ दिवसानंतर दुकाने उघडली. अनेक व्यावसायिकांनी दुकानांच्या शटरचे सॅनिटायझेशन करून घेतले. दुकाने उघडल्यावर सर्वत्र आधी साफसफाई करताना ग्राहकांची काळजी घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

ग्राहकांना पाहून दुकानदार सुखावलेठप्प झालेला व्यवसाय पुन्हा रुळावर येणार की नाही, या चिंतेत असलेल्या व्यापाºयांना बाजारपेठेतील ग्राहकांची गर्दी पाहून दिलासा मिळाला. दुकानात आलेल्या ग्रहकांना पाहून दुकानदार सुखावल्याचे चित्र बाजापेठेत होते.हे निर्बंध कायमच!पी-1 व पी-2 लाइनमधील पान, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारी आस्थापना, सिनेमागृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे, बार (मद्यगृहे) प्रेक्षक गृहे, मंगल कार्यालये, हॉटेल्स, रेस्टॉरंट, लॉजिंग, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खासगी शिकवणी वर्ग, कटिंगची दुकाने, सलून, स्पा, ब्युटी पार्लर, टी-स्टॉल बंद राहतील. शहरामध्ये कापड, फळे, भाजीपाला इत्यादी किरकोळ फेरीवाले, व्यावसायिकांना रस्त्याच्या कडेला बसून व एकाच जागी थांबून व्यवसाय करता येणार नाही.  दूध डेअरी व दूध विक्री वगळता किराणा, मेडिकल, फळे, भाजीपाला, बेकरी, डेली निड्स विक्रीची दुकाने आस्थापना हे सम-विषम दिनांकाप्रमाणेच सुरू राहतील.

येथे करा पार्किंगबाजारपेठेतील पी-01 लाइन सुरू असल्यास पी-01 लाइनमधील दुकानासमोर पार्किंग करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त कापडणीस यांनी दिले आहे.

सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू-बंद करण्याच्या निर्णयाची सर्वांनी अंमलबजावणी करावी. तब्बल अडीच महिन्यांनंतर बाजारपेठ खुली होत आहे. त्यामुळे शहराचे अर्थचक्र सुरळीत होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. शुक्रवारी पहिला दिवस असल्याने अनेक ठिकाणी दोन्ही बाजूची दुकाने उघडी दिसली; मात्र उद्यापासून प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, अशी सर्वांनाच विनंती आहे.- रमाकांत खेतान,अध्यक्ष किराणा मर्चंट असोसिएशन

 

 

टॅग्स :AkolaअकोलाMarketबाजार