शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपासून बेपत्ता महिला कोलकात्यात सापडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 13:39 IST

अकोला: तीन वर्षांपूर्वी कोलकाता महानगरातील रस्त्यावर बेवारस स्थितीत पडलेली एक ३0 वर्षीय महिला आढळून आली होती. तेथील ईश्वर संकल्प सेवा केंद्राच्या सदस्यांनी तिला केंद्रात आणले.

अकोला: तीन वर्षांपूर्वी कोलकाता महानगरातील रस्त्यावर बेवारस स्थितीत पडलेली एक ३0 वर्षीय महिला आढळून आली होती. तेथील ईश्वर संकल्प सेवा केंद्राच्या सदस्यांनी तिला केंद्रात आणले. तिच्यावर उपचार केल्यावर तिने तिचे नाव संगीता दत्ताभाऊ हिंगमिरे असून, ती अकोल्यात राहणारी असल्याचे सांगत आहे. ईश्वर संकल्प संस्थेला संगीता कुठे राहणारी आहे, हे सापडले आहे; परंतु तिचे कुटुंबीय शोधण्याचे आव्हान पुढे ठाकले आहे.२0१६ मध्ये कोलकोता महानगरातील रस्त्यावर बेवारस आणि आजारी स्थितीत संगीता दत्ताभाऊ हिंगमिरे ही महिला ईश्वर संकल्प सेवा केंद्राच्या सदस्यांना आढळून आली. या सदस्यांनी तिला कोलकात्यातील ईश्वर संकल्प सेवा केंद्रात आणले. या ठिकाणी तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यावेळी तिला सिझोफोमिया आजार असल्याचे निदान झाले. एक वर्षाच्या उपचारानंतर तिने तिचे नाव संगीता असल्याचे सांगितले. ती मराठी भाषा बोलते. संगीताला संस्थेने हस्तकला, शिवणकामाचे प्रशिक्षणसुद्धा दिले. तिच्या आधारकार्डवरसुद्धा संगीता दत्ताभाऊ हे नाव असल्याचे समोर आले आहे. संगीताने तिच्या पतीचे नाव सतीश असून, तो जयपूरला राहत असल्याचे सांगितले. एवढेच नाही, तर तिच्या पतीने तिला रस्त्यावर बेवारस सोडून पलायन केले होते. तिच्या माहितीनुसार ईश्वर संकल्प सेवा केंद्राच्या सदस्यांनी पोलिसांच्या मदतीने पतीचा शोध घेतला; परंतु त्याने तिच्यासोबत संबंध असल्याचे नाकारले आहे. त्यामुळे आता सेवा केंद्राचे सदस्यांनी तिच्या माहेरचा पत्ता विचारला असता संगीता तिचे माहेर अकोल्यातील असल्याचे सांगत आहे. एवढेच नाही, तर वडिलांचे नाव दत्ताभाऊ, आईचे नंदाबाई, भावाचे नाव राजू हिंगमिरे असल्याचे सांगत आहे. वडील कारपेंटर आहेत. या माहितीच्या आधारे ईश्वर संकल्प सेवा केंद्राचे सदस्य व पोलीस संगीताच्या कुटुंबाचा शोध घेत आहेत; परंतु तिचे कुटुंबीय कोठे राहतात, याची माहिती मिळत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. तिचे कुटुंबीय मिळाल्यास निराधार संगीताला घर मिळेल. नागरिकांनीसुद्धा यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन ईश्वर संकल्प सेवा केंद्राने केले आहे. (प्रतिनिधी)संगीता नामक महिला कोलकाता शहरात बेवारस स्थितीत सापडली. तिच्यावर आम्ही वैद्यकीय उपचार केले. ती मराठी भाषा बोलते. अकोल्याची राहणारी असल्याचे ती सांगते. तिच्या कुटुंबीयांचा शोध लागल्यास तिला आधार मिळेल.-तपन प्रधान, सदस्य,ईश्वर संकल्प सेवा केंद्र कोलकाता. 

 

टॅग्स :AkolaअकोलाMissingबेपत्ता होणं