शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

शिकवणी वर्गातील बेपत्ता विद्यार्थी आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 18:44 IST

अकोला : अमरावती जिल्हयातील मोर्शी येथील रहिवासी जवाद मलीक जमील अहमद हा युवक शहरातील एका खासगी शिकवणी वर्गात शिकवणी वर्गासाठी असून १८ डिसेंबर रोजी अचाणक बेपत्ता झाल्यानंतर तो गुरुवारी बल्लारशाहा येथे रेल्वे पोलिसांना आढळला.

अकोला : अमरावती जिल्हयातील मोर्शी येथील रहिवासी जवाद मलीक जमील अहमद हा युवक शहरातील एका खासगी शिकवणी वर्गात शिकवणी वर्गासाठी असून १८ डिसेंबर रोजी अचाणक बेपत्ता झाल्यानंतर तो गुरुवारी बल्लारशाहा येथे रेल्वे पोलिसांना आढळला.जवाद मलिक जमील अहमद (१९) हा युवक १९ डिसेंबरच्या सायंकाळी ६ वाजता शिकवणी वर्ग आटोपल्यानंतर कृषी नगर परिसरातील त्याच्या रुमवर गेला होता. त्यानंतर रुममध्येच रहिवासी असलेल्या दुसऱ्या मित्राला रुग्णालयात जाऊन येतो अशा प्रकारचा मॅसेज केला. मात्र त्यानंतर तो रुमवर परत आलाच नाही. त्यामुळे त्याच्या मित्राने जावेद बेपत्ता असल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यांनीही शोध सुरु केला मात्र त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यामुळे जवादचे कुटुंबीय अमरावती येथून अकोल्यात आले. त्यांनी या प्रकरणाची माहिती सिव्हील लाईन्स पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने शोध सुरु केला. या विद्यार्थ्याच्या शोधासाठी अमरावतीच्या श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या तपासणीमध्ये विद्यार्थ्याच्या रुमपासून तर महामार्गापर्यंत श्वानाने आणून सोडले होते. तर तपासणी करणाºया पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे जवादच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन हे अकोला रेल्वे स्टेशन होते. याप्रकरणी तपास केल्यानंतर रेल्वे क्रमांक १२५१५ या एक्सप्रेसमध्ये तो प्रवास करीत असल्याचे आढळल्यानंतर त्याला रेल्वे पोलिसांच्या मदतीने बल्लारशाहमध्ये उतरविण्यात आले. त्यास सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले असून, त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. जावेदमुळे शिकवणी वर्ग संचालक आणि पोलिसांना नाहकच त्रास सहन करावा लागला असून त्याच्या बेपत्ता होण्याचे कारण मात्र अद्याप समोर आले नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाMissingबेपत्ता होणंStudentविद्यार्थी