शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ४० दिवसांनी सापडला बेपत्ता कोविडग्रस्त मनोरुग्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 10:39 IST

सिटी कोतवाली पोलिसांनी त्या मनोरुग्णाला शुक्रवारी ताब्यात घेऊन मानसोपचार रुग्णालयाकडे हस्तांतरीत केले.

अकोला: सर्वोपचार रुग्णालयात कोरोेनाच्या उपचारासाठी दाखल मनोरुग्ण १५ आॅगस्टपासून रुग्णालयातून बेपत्ता झाला होता. तब्बल ४० दिवसांनी हा रुग्ण सिंधी कॅम्प परिसरात आढळून आला. सिटी कोतवाली पोलिसांनी त्या मनोरुग्णाला शुक्रवारी ताब्यात घेऊन मानसोपचार रुग्णालयाकडे हस्तांतरीत केले.अमरावती जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेले ५१ वर्षीय अविनाश लोखंडे यांच्यावर मागील पाच वर्षांपासून मानसोपचार तज्ज्ञ डॉ. केळकर यांच्याकडे उपचार सुरू होता. मनोरुग्ण अविनाश यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र १५ आॅगस्ट रोजी ते अचानक बेपत्ता झाले होते. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. रुग्णाचा घातपात झाल्याची शंकाही त्यांच्या नातेवाइकांकडून करण्यात येत होती. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या बेपत्ता मनोरुग्णाला शोधणे पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान होते. तपास सुरू असताना शुक्रवारी सिटी कोतवाली पोलिसांना बेपत्ता मनोरुग्ण सिंधी कॅम्प परिसरात असल्याची माहिती फोनवरून एका व्यक्तीने दिली. माहिती मिळताच पोलिसांनी सिंधी कॅम्प परिसरात धाव घेत संबंधित मनोरुग्ण हा अविनाश लोखंडे असल्याची खात्री केली. खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्याला सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात नेले व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. केळकर यांच्याकडे सुपुर्द केल्याची माहिती सिटी कोतवालीचे ठाणेदार उत्तम जाधव यांनी दिली.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या