शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील निल्लमाची दोन वर्षांनंतर झाली कुटुंबीयांसोबत भेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 13:44 IST

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयामध्ये दोन महिन्यांपासून उपचारासाठी दाखल असलेल्या एका अनोळखी महिलेला तब्बल दोन वर्षांनंतर गुरुवारी तिच्या कुटुंबीयांची भेट झाली.

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयामध्ये दोन महिन्यांपासून उपचारासाठी दाखल असलेल्या एका अनोळखी महिलेला तब्बल दोन वर्षांनंतर गुरुवारी तिच्या कुटुंबीयांची भेट झाली. सर्वोपचार रुग्णालयातल अधिकारी व कर्मचाºयांच्या प्रयत्नामुळे दोन वर्षांपासून बेपत्ता असलेली महिला कुटुंबीयांना भेटली.सर्वोपचार रुग्णालयाममध्ये गत दोन महिन्यांपासून एक अनोळखी महिला रुग्ण उपचाराकरिता दाखल होती. सदर महिलेला मराठी भाषा येत नसल्यामुळे तिच्याशी संवाद साधणे कठीण झाले होते; मात्र त्यातही सर्वोपचार रुग्णालयातील कार्यरत समाजसेवा अधीक्षक विनायक साखरे यांनी महिलेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता ती महिला कन्नड भाषा बोलत असल्याचे समोर आले. त्यानंतर कन्नड भाषा येत असलेल्या एका व्यक्तीला सोबत घेऊन महिलेसोबतच संवाद साधण्यात आला. तिचा विश्वास संपादन करण्यात आला व त्यानंतर तिची चौकशी केली असता तिचे नाव निल्लमा असल्याचे तिने सांगितले. यासोबतच ती कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील चितापूर तालुक्यापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या यरगल या गावातील रहिवासी असल्याचे तिने सांगितले. यावरून साखरे यांनी गुलबर्गा येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधून चीतापूर तालुका ठाणेदार यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी सदर महिलेची माहिती चितापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना दिली. ठाणेदारांनी तिचा व्हॉट्स अ‍ॅपवर फोटो बोलावून माहिती घेतली असता सदर महिला यरवल येथील असल्याची माहिती समोर आली. सदर महिला ही गत दोन वर्षांपासून बेपत्ता असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले व तिचा दोन वर्षांपासून शोध घेण्यात येत होता; मात्र तिचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने कुटुंबीय परेशान झाले होते. अशातच सदर महिला अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने अकोला गाठले. दोन वर्षांपासून ताटातूट झालेल्या निलम्मा व तिच्या कुटुंबीयांची गुरुवारी रुग्णालयात भेट झाली. यासाठी कुटुंबीयांना सोबत पुन्हा जोडण्यासाठी सर्व रुग्णालयातील उमेश रामटेके, अधीक्षक शिरसाट यांनी मोलाचे सहकार्य केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाKarnatakकर्नाटकWomenमहिला