शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आमदार गोपीकिशन बाजोरियांच्या भूखंडाची फाइल गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 12:28 IST

शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी गुंठेवारी जमिनीचा प्रस्ताव मागे घेत, ले-आउटचा प्रस्ताव मनपाच्या नगररचना विभागाकडे सादर केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिकेच्या नगररचना विभागाने मंजूर केलेली शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या भूखंडाची फाइल सोमवारी रात्री नगररचना विभागातून गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उजेडात आला. या प्रकाराची गंभीर दखल घेत आ. बाजोरियांनी मंगळवारी दुपारी तडकाफडकी मनपा आयुक्तांचे कार्यालय गाठले. दुसरीकडे नगररचना विभागाचे सहायक संचालक पी. दांदळे यांच्यामुळे अनियमितता वाढीस लागल्याचा आरोप करीत माजी महापौर विजय अग्रवाल यांनी आयुक्तांकडे दांदळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. गुंठेवारीच्या मुद्यावर आ. बाजोरिया आणि अग्रवाल यांच्यात चांगलेच घमासान रंगल्याची माहिती आहे.महापालिका प्रशासनाने गुंठेवारी जमिनीचे प्रस्ताव मंजूर न करण्याचे धोरण आखले आहे. गुंठेवारी जमिनीचे नियमानुसार ले-आउट केल्यानंतरच सदर प्रस्ताव मंजूर केले जात आहेत. काही महिन्यांपूर्वी शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी गुंठेवारी जमिनीचा प्रस्ताव मागे घेत, ले-आउटचा प्रस्ताव मनपाच्या नगररचना विभागाकडे सादर केला.या विभागाचे सहायक संचालक पी. दांदळे यांनी प्रस्तावातील त्रुटी दूर झाल्याची खात्री केल्यानंतर ले-आउटची फाइल मंजूर करीत, पुढील अंतिम मंंजुरीसाठी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे सादर केली. आयुक्तांनी अवलोकन केल्यानंतर सदर फाइल मंजूर करीत, मनपाकडे ४२ लाख रुपये विकास शुल्क जमा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आ. बाजोरियांनी ३ फेब्रुवारी रोजी मनपाकडे विकास शुल्काचा भरणा केला.हा भरणा केल्यानंतर सोमवारी रात्री नगररचना विभागातून आ. बाजोरियांच्या भूखंडाची फाइल गहाळ झाल्याची बाब मंगळवारी सकाळी उजेडात आली.या प्रकाराची माहिती मिळताच आ. बाजोरियांनी आयुक्त संजय कापडणीस यांच्या दालनात धाव घेऊन विचारणा केली. यादरम्यान, नगररचना विभागाचे प्रभारी सहायक संचालक पी. दांदळे यांनी नियमबाह्य कामांना मंजुरी देण्याचा सपाटा लावल्याचा आरोप करीत, माजी महापौर विजय अग्रवाल यांनी आयुक्तांकडे दांदळे यांच्यावर कारवाईची मागणी रेटून धरली. यावेळी गुंठेवारी जमिनीचा मुद्दा उपस्थित झाला असता, आ. बाजोरिया आणि माजी महापौर अग्रवाल यांच्यात घमासान रंगले होते.गुंठेवारी जमिनीचा प्रस्ताव मागे घेत मनपाकडे ले-आउटची फाइल प्रस्तावित केली. प्रशासनाने मंजुरी दिल्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी मनपाकडे ४२ लाख रुपये विकास शुल्क जमा केले. सक ाळी ही फाइल गहाळ झाल्याची माहिती मिळाली. मनपातील भ्रष्ट कारभाराने कळस गाठल्याचे यानिमित्ताने समोर आले. प्रशासनाने दोषींवर कारवाई करावी; अन्यथा परिणाम भोगावे लागतील.-गोपीकिशन बाजोरिया, आमदारनगररचना विभागातील अधिकाऱ्यांना दमदाटी करून, गाडीत कोंबून आयुक्तांकडे नेणाºया लोकप्रतिनिधींची मनमानी मनपात चालणार नाही. गुंठेवारीच्या प्रकरणांना ‘ब्रेक’ लागल्याने संबंधित लोकप्रतिनिधींचा तीळपापड होत आहे. मनपा पदाधिकाऱ्यांबद्दल अपशब्दाचा वापर करणाºयांना धडा शिकविला जाईल, यात दुमत नाही.-विजय अग्रवाल, माजी महापौर

नगररचना विभागातील नऊ अधिकारी-कर्मचाºयांचे बयाण नोंदविले आहे. उद्या दुपारी १२ वाजतापर्यंत संबंधित फाइल न शोधल्यास या विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाºयांविरोधात पोलीस तक्रार नोंदविली जाईल.-संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाGopikishan Bajoriaगोपीकिशन बाजोरीया