शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोपचारमधील शवविच्छेदन गृहातून मच्यरुरी बुक गायब!

By admin | Updated: August 31, 2016 02:47 IST

सर्वोपचार रुग्णालयातील दस्ताऐवज असुरक्षित; पोलिसात तक्रार.

अकोला, दि. ३0: पश्‍चिम विदर्भाचे ट्रामाकेअर सेंटर म्हणून ओळखल्या जाणार्‍या सर्वोपचार रुग्णालयामध्ये दररोज काहीतरी विपरीत घटना घडतात. रुग्णालयामध्ये रुग्णांसोबतच महत्त्वाचे दस्ताऐवजसुद्धा सुरक्षित नसल्याची बाब मंगळवारी समोर आली. रुग्णालयातील शवविच्छेदन गृहामधून मच्यरुरी बुकच गायब केल्याची घटना घडली. यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मृतकांची माहिती असलेले हे बुक कोणी आणि कशासाठी गायब केले, असा प्रश्न वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला पडला आहे. आजारी असलेल्या, अपघातामध्ये जखमी झालेल्या किंवा इतर कारणांमुळे भरती असलेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर त्याचा मृतदेह सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन विभागात पाठविण्यात येतो. मृतदेहांविषयी प्राथमिक माहितीसोबतच मृतदेह पोलीस, नातेवाइकांच्या ताब्यात दिल्याची माहिती शवविच्छेदन गृहातील मच्यरुरी बुकमध्ये नोंदविल्या जाते. त्यानंतर ही माहिती संगणकामध्येसुद्धा संकलित केली जाते. मंगळवारी दुपारी एका मृतकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात आला. या ठिकाणी या मृतकाची माहिती मच्यरुरी बुकमध्ये नोंदवायची असल्याने, संबंधित कर्मचार्‍यानी बुक पाहिले; परंतु त्याला शवविच्छेदन गृहामध्ये कुठेच मच्यरुरी बुक मिळून आले नाही. मच्यरुरी बुक गायब झाल्यामुळे शवविच्छेदन गृहातील कार्यरत डॉक्टर व कर्मचार्‍यांची धावपळ उडाली. त्यांनी वरिष्ठांच्या कानापर्यंत हा प्रकार घातला आणि मच्यरुरी बुक गायब झाल्याची कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. मच्यरुरी बुक हरविले; परंतु आमच्याकडील संगणकामध्ये संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे मच्यरुरी बुकमुळे फारसा फरक पडणार नाही. यासंबंधीची तक्रार आम्ही पोलिसात नोंदविली आहे. - डॉ. दिनेश नेताम, उप वैद्यकीय अधीक्षक, सर्वोपचार रुग्णालय