अकोला, दि. ३१- गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारी सात वाहने पकडून, ९0 हजार रुपये दंड वसूल करण्याची कारवाई शुक्रवारी अकोला तहसील कार्यालयाच्या भरारी पथकाने केली.अकोला शहरानजीक असलेल्या बाळापूर नाका आणि घुसर रोड येथे गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारी सात वाहने पकडण्यात आली. त्यामध्ये मुरुमाची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक, रेतीची वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर व एक मेटॅडोर आणि गिट्टीची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर अशी सात वाहने पकडण्यात आली. ह्यरॉयल्टीह्णचा भरणा न करता गौण खनिजाची अवैध वाहतूक करणार्या या सात वाहनांपैकी सहा वाहन मालकांकडून ९0 हजार रुपये दंड वसुलीची कारवाई करण्यात आली, तर मुरुमाची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. अकोल्याचे उपविभागीय अधिकारी ओ.आर. अग्रवाल आणि तहसीलदार राजेश्वर हांडे यांच्या आदेशानुसार अकोला तहसील कार्यालयाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. गत दोन दिवसांपूर्वीदेखील गौण खनिजाची अवैध वाहतूक करणार्या सात वाहनांवर तहसील कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली होती.
गौण खनिज अवैध वाहतूक; सात वाहने पकडली!
By admin | Updated: April 1, 2017 02:47 IST