शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध खदानीतून गौण खणिजाचे उत्खनन; विनापरवानगी ‘स्टोन क्रेशर’ची उभारणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 12:44 IST

आदिवासीच्या जमिनीवर अवैध खदानीतून गौण खणिजाचे उत्खनन आणि विनापरवानगी ‘स्टोन के्रशर’यूनिटची उभारणी करण्यात आली आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील अकोट तालुक्यात गाजीपूर शिवारात एका आदिवासीच्या जमिनीवर अवैध खदानीतून गौण खणिजाचे उत्खनन आणि विनापरवानगी ‘स्टोन के्रशर’यूनिटची उभारणी करण्यात आली आहे. यासंदर्भात कारवाई करण्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.अकोट तालुक्यात गाजीपूर येथील सर्व्हे नंबर १५ व २७ मधील विलास कालू चिमोटे या आदिवासी शेतकऱ्याच्या जमिनीवर अकोट येथील संतोष चांडक यांनी विनापरवानगी अवैध खदानीतून गौण खणिजाचे उत्खनन करून सर्व्हे नंबर ३८ मधील जमिनीवर विनापरवानगी ‘स्टोन क्रेशर’ युनिट उभारण्यात आल्याची तक्रार पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्याकडे प्राप्त झाली. त्यानुषंगाने यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश २ फेबु्रवारी रोजी पालकमंत्र्यांनी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना दिला. त्यानुसार अकोट तालुक्यातील गाजीपूर येथे एका आदिवासी शेतकºयाच्या जमिनीवर अवैध खदानीतून गौण खणिजाचे उत्खनन आणि विना परवानगी उभारण्यात आलेल्या ‘स्टोन के्रशर ’ युनिटची चौकशी जिल्हा खनिकर्म विभागामार्फत ४ फेबु्रवारीपासून सुरू करण्यात आली आहे.१२.५० लाखाच्या दंडाची रक्कम वसूल करण्याचे तहसीलदारांना निर्देश!अकोट तालुक्यातील गाजीपूर येथील अवैध खदानीतून गौण खणिजाचे उत्खनन करताना एक पोकलेन व दोन डम्पर जप्त करून संतोष चांडक यांना १२ लाख ५० हजार रुपये दंड आकारण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकाºयांमार्फत गत २ आॅगस्ट २०१९ रोजी करण्यात आली होती. या दंडाची रक्कम वसूल करण्याचे निर्देश जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.अतुल दोड यांनी ४ फेबु्रवारी रोजी अकोट तहसीलदारांना पत्राद्वारे दिले. दंडाची रक्कम जमा न केल्यास दंडाच्या रकमेचा बोजा संबंधितांच्या सात-बारावर चढविण्याच्या सूचनाही तहसीलदारांना देण्यात आल्या.‘डीजीपीएस’ यंत्राद्वारे होणार खदानीच्या उत्खननाची तपासणी !गाजीपूर येथील अवैध खदानीतून गौण खणिजाच्या उत्खननाची तपासणी नागपूर येथील खनिकर्म संचालनालयामार्फत ‘डीजीपीएस’ यंत्राद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी तांत्रिक चमूसह ‘डीजीपीएस’ यंत्र उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा खनिकर्म अधिकाºयांमार्फत नागपूर येथील खनिकर्म संचालनालयाकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. ‘डीजीपीएस’ यंत्राद्वारे होणाºया तपासणीत खदानीच्या अवैध उत्खननाची वास्तविकता स्पष्ट होणार आहे.

पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार अकोट तालुक्यातील गाजीपूर येथील अवैध खदानीतून गौण खणिजाचे उत्खनन आणि विना परवानगी उभारण्यात आलेल्या ‘स्टोन क्रेशर’ युनिटची चौकशी सुरू करण्यात आली आहे.-डॉ.अतुल दोडजिल्हा खनिकर्म अधिकारी.

 

टॅग्स :Akolaअकोला