शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

किमान तापमानात झाली वाढ; रस्त्यावर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 14:26 IST

अकोला: शहराच्या तापमानात मार्च संपल्यानंतर लक्षणीय वाढ झाली असून, मे हिटचा तडाखा जाणवू लागल्याने अकोलेकरांच्या अंगाची लाहीलाही झाली आहे.

अकोला: शहराच्या तापमानात मार्च संपल्यानंतर लक्षणीय वाढ झाली असून, मे हिटचा तडाखा जाणवू लागल्याने अकोलेकरांच्या अंगाची लाहीलाही झाली आहे. रविवारपासून किमान तापमानात वाढ झाली. १४ ते १८ असणारे हे तापमान २४ ते २५ अंशावर गेले. अकोलेकरांना तापमान नवे नाही. तथापि, यावर्षी मार्च महिन्यातच कमाल उन्हाचा पारा ४३ अंशावर गेला. देशात सध्या निवडणुकीच्या प्रचाराने आधीच वातावरण तापले असताना आता अकोला शहराच्या तापमानाने या आठवड्यात ४१ ते ४४ अंशाचा पारा ओलांडला आहे. हे तापमान एप्रिल-मेमध्ये ४५ आकडा ओलांडेल असा अंदाज आहे. दरम्यान, उन्हाचा पारा वाढल्याले सोमवारी दुपारी रस्त्यावर शुकशुकाट होता.वाढत्या तापमानामुळे सकाळी-दुपारी उष्णतेच्या तीव्र झळा लागू लागल्याने नागरिक घराबाहेर पडणे आता टाळत आहेत; मात्र तरीही कामधंदे, महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणे जरुरी आहे. मागील दहा दिवसात शहराच्या तपमानाचा पारा ३८ अंशावरून पुढे जात ४३ अंशावर गेला. तर मागील आठवड्यात वातावरणात काही प्रमाणात बदल झाला होता. त्यावेळी अकोला शहरासह जिल्हा, वºहाडात काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे तापमानात थोडी फार घटदेखील झाली होती.दरम्यान, आता पुन्हा तापमानाचा पारा या तीन दिवसात पुन्हा वर चढत असून, तापमानाने ४३ ते ४४ वर पोहोचला आहे. सकाळी ८ वाजेपासूनच उन्हाचे चटके व झळा जाणू लागल्या आहेत आणि या असह्य झळांपासून संरक्षणासाठी शेतीची मशागतीची कामे करणारे शेतकरी डोक्यात शेले, टोप्या व अकोलेकरही गॉगल्स, डोक्याला शेले, रूमाल बांधण्यासाठीची मागणी वाढली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाweatherहवामान