शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

प्रणिती शिंदे यांना एमआयएमची नोटीस

By admin | Updated: November 8, 2014 23:18 IST

माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा.

अकोला- सोलापूरच्या (मध्य) आमदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांना ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुसलमीनच्यावतीने (एमआयएम) शनिवारी कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. आ. शिंदे यांनी एमआयएम नेत्यांची भाषणे देशविरोधी असल्याचे वक्तव्य केले होते.एका खासगी वाहिनीवरील कार्यक्रमात बुधवार दि. ५ नोव्हेंबर रोजी आ. प्रणिती शिंदे यांनी एमआयएमविरुद्ध बोलताना या पक्षाच्या नेत्यांची भाषणे ऐकली तर ते देशविरोधक वाटतात. त्यामुळे या पक्षावर कायमची बंदी आणण्यात यावी, अशी मागणी केली होती. एमआयएमला देशद्रोही म्हणणार्‍या आ. शिंदे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी एमआयएम नेते खासदार अससुद्दीन ओवैसी यांनी केली होती. माफी मागण्यास आ. शिंदे यांनी नकार दिल्याने अखेर खा. ओवैसी यांच्यावतीने शनिवारी आ. प्रणिती शिंदे यांच्याविरोधात कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. या नोटीसद्वारे आ. शिंदे यांनी नोटीस मिळताच त्यांच्या वक्तव्याबाबत प्रसार माध्यमांमधून जाहीर माफी मागण्यास सांगण्यात आले आहे. माफी न मागितल्यास आ. शिंदे यांच्याविरोधात न्यायालयीन आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे अँड. खिजर पटेल आणि खा. ओवैसी यांच्यातर्फे अँड. कादरी अन्वर यांनी दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.