शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘एमआयडीसी’तील भूखंड वाटपात कोट्यवधींचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 12:35 IST

भूखंडाची कागदपत्रे आगीत जळाल्याचाही बनाव केल्याचे धक्कादायक वास्तव चौकशी समितीच्या निदर्शनास आल्यानंतर या पाचही बड्या अधिकाऱ्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला: एमआयडीसीच्या क्षेत्रीय अधिकारी दर्जाच्या पाच अधिकाऱ्यांनी संगनमत करून भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करीत खोट्या व बनावट नोंदी करून कोट्ट्यवधींच्या भूखंडाचे बेकायदेशीर वाटप करीत घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या भूखंडाची कागदपत्रे आगीत जळाल्याचाही बनाव केल्याचे धक्कादायक वास्तव चौकशी समितीच्या निदर्शनास आल्यानंतर या पाचही बड्या अधिकाऱ्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, तिघे फरार आहेत.अकोला एमआयडीसीमधील भूखंड क्रमांक टीए ७८, टीए ४६, एन १५४, एन १६० या भूखंडाच्या वाटपामध्ये तसेच मुदतवाढ प्रकरणांमध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन प्रादेशिक अधिकारी कुंदा किशोर वासनिक रा. गणपती नगर लॉर्ड्स होस्टेलजवळ अमरावती, अमरावतीचे तत्कालीन क्षेत्र व्यवस्थापक दिलीप चेंडुजी पाटील रा. उमरेड जि. नागपूर, अमरावतीचे अतिरिक्त कार्यभार क्षेत्र व्यवस्थापक गजानन भास्कर ठोके रा. साई नगर मंदिराजवळ अमरावती, रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता अविनाश रूपराव चंदन रा. दत्तकृपा सुधीर कॉलनी विवेकानंद आश्रम शाळेजवळ अकोला व अमरावती एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक पुरुषोत्तम मारुतराव पेटकर रा. मानेवाडा रोड नागपूर या पाच बड्या अधिकाºयांविरुद्ध एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजाराम गुळके यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. या सर्व अधिकाºयांनी संगनमत करून महामंडळाचे आर्थिक नुकसान केले. तसेच स्वत:च्या फायद्यासाठी नियमबाह्य कृत्य करून बनावट दस्तऐवज तयार केले व ते दस्तऐवज खरे असल्याचे सांगून फसवणूक केली, असा त्यांच्यावर आरोप आहे. भूखंड क्रमांक टीए ७८ या भूखंडाचे वाटप उर्वरित अधिमूल्याची रक्कम न भरताच भूखंडाची नस्ती तयार केली व खोट्या व बनावट नोंदी करून आवक-जावक रजिस्टरच आरोपींनी गहाळ केले. त्यानंतर २५ डिसेंबर २०१७ रोजी कागदपत्रे कार्यालयाला लागलेल्या आगीत जळाल्याचे सांगितले. एक हजार चौरस मीटरचा भूखंड वाटपपत्राद्धारे श्रीमती कृपा शहा मे श्री कृपा लाजिस्टिक यांना करण्यात आले. यावेळी भूखंडाच्या वाटपावेळी सहायक क्षेत्र व्यवस्थापक अविनाश चंदन होते. त्यांनी तीन लाख रुपयांचा भरणा करून न घेताच भूखंडाचे वाटप केल्याचे चौकशी दरम्यान समोर आले. यावरून सर्व अधिकाºयांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८, ४७१, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्रिसदस्यीय समितीने केली चौकशीआरोपींनी भूखंडाचे वाटप करतेवेळी टिपणी सादर केली. तसेच भूखंडाच्या वाटपपत्रावर खाडाखोड केली असून, वाटपपत्र बनावट असल्याचे दिसून आले. तसेच वाटपपत्र ज्या काळात निर्गमित करण्यात आले, त्या काळातील आवक-जावक रजिस्टर हे कार्यालयातून गहाळ केले. या भूखंडासंदर्भात कुंदा वासनिक यांनी १४ आॅगस्ट २०१७ रोजी भूखंडधारकासोबत गैरकायदेशीर करारनामा केला, असे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या चौकशीत समोर आले.

टॅग्स :AkolaअकोलाAkola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळ