शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

लाखो रुपयांची कीटकनाशके, खते उघड्यावर फेकून दिली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 2:27 AM

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव (पु.म.) पासून १ कि.मी. अंतरावरील सांजापूर शे तशिवारातील रोडच्या खाली एका खड्डय़ात शेतीला लागणारा उपयोगी असा कृषी मालाचा लाखो  रुपये किमतीचा माल बेवारस स्थितीत आढळून आला आहे. हा माल कोणाच्या मालकीचा आहे व  तो कुणी आणून उघड्यावर बेवारस फेकला, या विषयी सध्या येथे चर्चेला उधाण आले आहे.

ठळक मुद्देसांजापूरजवळील घटना ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव (पु.म.) पासून १ कि.मी. अंतरावरील सांजापूर शे तशिवारातील रोडच्या खाली एका खड्डय़ात शेतीला लागणारा उपयोगी असा कृषी मालाचा लाखो  रुपये किमतीचा माल बेवारस स्थितीत आढळून आला आहे. हा माल कोणाच्या मालकीचा आहे व  तो कुणी आणून उघड्यावर बेवारस फेकला, या विषयी सध्या येथे चर्चेला उधाण आले आहे.मूर्तिजापूर तालुक्यात येणार्‍या सांजापूर शेत शिवारातील रेल्वे गेटपासून शंभर फूट अंतरावर  असलेल्या एका हरभर्‍याच्या शेताजवळ खड्डय़ात लाखो रुपये किमतीची मुदतबाह्य ठरलेली  कीटकनाशके व खते मोठय़ा प्रमाणात फेकून दिल्याचे आढळून आले आहे. या कीटकनाशके व  खतांमध्ये सार्थक कंपनीचे बोरान, सल्फर ९0 टक्के, मेटाडॉन, खताची पाकिटे, सार्थक क्रॉप  टॉनिक, रोगजंतू सापळे (चाळणी), लेबल नसलेल्या एक लीटरच्या केमिकल बॉटल आणि इतर  साठा मोठय़ा प्रमाणात बेवारस स्थितीत आढळून आल्याने हा विषय सांजापूर ग्रामस्थांमध्ये चर्चेचा  ठरला आहे. सदर माल कोणाचा आहे आणि तो असा बेवारस अवस्थेत का फेकून देण्यात आला,  हे एक कोडेच बनले आहे.एकीकडे राज्य शासन शेतकर्‍यांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी  विविध योजना राबवून त्याचा फायदा शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहे. शेती  सुजलाम् सुफलाम् व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवून कृषी विभागाच्या वतीने मोफत किंवा अल्पशा  दरात कीटकनाशके व खतांचा माल शेतकर्‍यापर्यंत पोहोचविला जातो; मात्र दुसरीकडे  हाच माल  बेवारस स्थितीत फेकला जात आहे. तो उघड्यावर बेवारस स्थितीत फेकण्यात आलेला माल विक्री न झाल्यामुळे फेकून दिला की  यामध्ये काही घोटाळा तर नाही ना, अशी चर्चा शेतकर्‍यांमध्ये होत आहे. बेवारस स्थितीत पडलेला  खते व कीटकनाशकांचा हा माल कृषी विभागाचा आहे की अन्य कुणाचा, याचा शोध लावणे  जरुरीचे आहे. संबंधित विभागाने बेवारस मालाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी  सांजापूर ग्रामस्थांकडून केली जात आहे. 

कंपनीला डिस्पाज करण्याचे अधिकार आहे. त्या पद्धतीने डिस्पोजल करणे गरजेचे आहे.  रासायनिक किटकनाशके उघड्यावर फेकणे घातक ठरु शकतात. तथापि घटनास्थळाची पाहणी  केल्यानंतरच कळेल. - मिलींद जंजाळ, गुणनियंत्रण अधिकारी अकोला  

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूर