शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

रोहयोतून लाखो मजुरांच्या हाताला काम!

By admin | Updated: October 2, 2015 00:07 IST

मजुरीच्या दरात वाढ झाली असून रोहयोअतंर्गत १ लाख ३४ हजार ९६५ कामे पूर्ण झाली आहेत.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा): महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात सन २0१४-१५ मध्ये १ लाख ३४ हजार ९६५ कामे पूर्ण झाली आहेत. सध्या १५ हजार ५२५ कामे सूरू असून, या कामांवर १ लाख १६ हजार ८७६ मजुरांची उपस्थिती आहे. रोहयोतून राज्यातील लाखो मजुरांच्या हाताला काम मिळाले असून, त्यांच्या मजुरीतही यावर्षी १३ रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमाची अंमलबजावणी १९७७ पासून सुरू झालेली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते, पूरनियंत्रण, जलसंधारण व जलसंवर्धन, दुष्काळ प्रतिबंधक, लघुसिंचन, जमिनीच्या विकासाकरीता सिंचनाची कामे, पारंपरिक जलस्त्रोतांचे नूतनीकरण, भूविकास, राजीव गांधी सेवा केंद्र, ग्रामीण पेयजल, ग्रामीण स्वच्छता अभियान आदी कामे केली जातात. २0१३-१४ या वर्षात ७८ हजार ८0७ कामे पूर्ण करण्यात आली होती, तर २0१४-१५ मध्ये सुमारे १९ हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायत क्षेत्रात या योजनेतंतर्गत कामे करण्यात आली. ११ लाख ६0 हजार कुटुंबातील एकूण २१ लाख ५६ हजार मजुरांनी यावर्षात १ लाख ३४ हजार ९६५ कामे पूर्ण केली. २0१४-१५ या वर्षातील एकूण कामांपैकी सर्वात जास्त ग्रामीण स्वच्छता अभियानांतर्गत ८७ हजार २५७ कामे पूर्ण झाली आहेत. त्याचबरोबर जमिनीच्या विकासाकरीता सिंचनाची १६ हजार ३५८, जलसंधारण व जलसंवर्धनाची १३ हजार २१७ कामे, दुष्काळ प्रतिबंधक ७ हजार ६८१, तर ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची ३ हजार ११ कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. सध्या १५ हजार ५२५ कामे सूरू असून, या कामांवर १ लाख १६ हजार ८७६ मजुरांची उपस्थिती आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा २00५ मधील कलम ६ नुसार प्रत्येक वर्षी मजुरी दर निश्‍चित करण्यात येतात. २0१४-१५ मध्ये मजुरीचा दर १६८ रुपये होता. यावर्षी २0१५-१६ मध्ये १८१ रुपये दर ठेवण्यात आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्‍या मजुरांची मजुरी त्यांच्या बँक किंवा पोस्ट खात्यामध्ये जमा केली जाते. २0१३-१४ अखेरपर्यंत ४६ लाख ७0 हजार, तर सन २0१४-१५ या वर्षअखेरपर्यंत ४७ लाख ५६ हजार मजुरांची खाती उघडण्यात आली आहेत.

*महिलांचा ४३ टक्के सहभाग

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत महिला व पुरूषांमध्ये भेदभाव न ठेवता समान मजुरीचे दर ठेवण्यात आले आहेत. योजनेमध्ये महिलांचा किमान ३३ टक्के सहभाग असणे गरजेचे आहे. योजनेंतर्गत राज्यामध्ये निर्माण झालेल्या एकूण मजुरांमध्ये सन २0१३-१४ या वर्षात ४३.६९ टक्के महिलांचा सहभाग होता. २0१४-१५ या वर्षात ४३.४७ टक्के महिलांचा सहभाग होता.

*एकाच महिन्यात २४ हजार मजुरांमध्ये वाढ

राज्यात मजुरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात ऑगस्ट २0१५ पर्यंत १२ हजार ६४६ कामे सुरू होती. या कामांवर ९२ हजार ९0८ मजुरांची उपस्थिती होती. एकाच महिन्यात मजुरांची संख्या २४ हजाराने वाढली आहे. सध्या राज्यात १५ हजार ५२५ कामे सूरू असून, या कामांवर १ लाख १६ हजार ८७६ मजुरांची उपस्थिती आहे.