शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

मसाला व्यावसायिकाच्या पुत्राला मागितली पाच लाखांची खंडणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 13:16 IST

अकोला: येथील प्रख्यात मसाला व्यावसायिकाच्या पुत्राला मुलीची छेडखानी केल्याच्या खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी देत पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या युवतीसह पाच जणांविरुद्ध डाबकी रोड पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला.

अकोला: येथील प्रख्यात मसाला व्यावसायिकाच्या पुत्राला मुलीची छेडखानी केल्याच्या खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी देत पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या युवतीसह पाच जणांविरुद्ध डाबकी रोड पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी लल्ल्या ऊर्फ आशिष इंगळे याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.जुने शहरातील जय हिंद चौकात राहणारा सुबोध सुधीर अभ्यंकर(२४) याच्या तक्रारीनुसार त्याच्या वडिलांचा मसाला विक्रीचा व्यवसाय आहे. सुबोध हा २७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास शेताकडे जात असताना, त्याला लल्ल्या ऊर्फ आशिष इंगळे(रा. भीम नगर), साक्षी चव्हाण आणि सोबतच्या चार अनोळखी युवकांनी अमानतपूर-ताकोडा रोडवर अडविले आणि त्याला शेतात नेऊन मारहाण केली आणि सुबोधला पाच लाख रुपये देण्याची मागणी केली. अन्यथा, तुझ्याविरुद्ध मुलीची छेड काढल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करू, अशी धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या सुबोधने ही माहिती कुटुंबियांना दिली. कुटुंबियांनी त्याला घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी लल्ल्या ऊर्फ आशिष इंगळे, साक्षी चव्हाण आणि चार अनोळखी युवकांविरुद्ध भादंविच्या कलम ३८५, ३८९, ३२३(३४) नुसार गुन्हा दाखल केला. डाबकी रोड पोलिसांनी आरोपी लल्ल्या ऊर्फ आशिष इंगळे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी