शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’च्या संकटात मदर मिल्क बँकेतील दूध संकलन घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 10:05 IST

तीन महिन्यांपासून या बँकेतील दूध संकलनात घट झाल्याने आता दहाऐवजी केवळ दोनच शिशूंना आईचे दूध मिळत आहे.

अकोला : बाळाला जन्म दिल्यानंतर ज्या मातांना पुरेसे दूध नाही, अशा मातांच्या शिशूंसाठी सर्वोपचार रुग्णालयातील मदर मिल्क बँक अमृततुल्यच आहे; पण कोरोनाचा फटका बसल्याने गत तीन महिन्यांपासून या बँकेतील दूध संकलनात घट झाल्याने आता दहाऐवजी केवळ दोनच शिशूंना आईचे दूध मिळत आहे.शिशूच्या जन्मानंतर अनेक मातांना दूध राहत नाही. अशा नवजात शिशूंना आईच्या दुधातून मिळणारे पोषक तत्त्व मिळणे शक्य होत नाही. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयात अशा शिशूंसाठी मदर मिल्क बँकेची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून आजपर्यंत शेकडो चिमुकल्यांचे प्राण वाचले आहेत. मदर मिल्क बँकेच्या माध्यमातून दररोज सरासरी दहा शिशूंना आईचे दूध दिल्या जाते; मात्र जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होताच, त्याचा फटका मदर मिल्क बँकेला बसला आहे. ऐरवी दररोज सरासरी १० शिशूंना या माध्यमातून आईचे दूध मिळायचे, ते आता केवळ दोनवर आले आहे.

म्हणून आईचे दूध आवश्यकशिशूंची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासह मृत्युदर रोखण्यात आईच्या दुधाचा मोठा वाटा आहे; मात्र कमी दिवसांच्या, कमी वजनाच्या किंवा अति धोका असलेल्या अनेक शिशूंना आईपासून दूर नवजात शिशू दक्षता कक्षात राहावे लागते. अशा बाळांसाठी आईचे दूध महत्त्वाचे ठरते.जीएमसीत घटली प्रसूतीची संख्या

सर्वोपचार रुग्णालयातील स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभाग कोविडसाठी राखीव ठेवल्याने या ठिकाणी प्रसूतीची संख्या घटली आहे. तर दुसरीकडे जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये केवळ एक किंवा दोन माता दूध दान करत आहेत.

कमी दिवसांचे बाळ किंवा एखाद्या घटनेत आईचा मृत्यू झाला असेल तर अशा प्रसंगात मदर मिल्क बँक वरदान ठरली आहे. अनेक दूध दाता माता अतिरिक्त दूध दान करतात. त्यावर प्रक्रिया करून साठवणूक केली जाते; मात्र गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वोपचारमधील प्रसूती कमी झाल्याने त्याचा परिणाम मिल्क बँकेवर झाला.- डॉ. विनीत वरठे,विभाग प्रमुख बालरोगशास्त्र विभाग जीएमसी, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्या