शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पडीक खदानीतील पाण्यावरही एमआयडीसीचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:29 IST

पाऊस-पाणी नसल्याने अकोला एमआयडीसी तील शेकडो उद्योग बंद पडण्याच्या स्थितीत असल्याने आता  एमआयडीसी जवळील पडीक खदानीतील पाण्याकडे  प्रशासनाने लक्ष वेधले आहे. एमआयडीसीजवळच्या जवळ पास आठ गिट्टी खदानातील पाणी बांधकाम आणि इतर  उद्योगांसाठी वापरता येऊ शकते का, याचा विचार आता सुरू  आहे.

ठळक मुद्देधरणात अल्प जलसाठा उद्योगांवर जलसंकट

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पाऊस-पाणी नसल्याने अकोला एमआयडीसी तील शेकडो उद्योग बंद पडण्याच्या स्थितीत असल्याने आता  एमआयडीसी जवळील पडीक खदानीतील पाण्याकडे  प्रशासनाने लक्ष वेधले आहे. एमआयडीसीजवळच्या जवळ पास आठ गिट्टी खदानातील पाणी बांधकाम आणि इतर  उद्योगांसाठी वापरता येऊ शकते का, याचा विचार आता सुरू  आहे.महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीत  ८९0 उद्योग सक्रिय आहेत. पैकी केमिकल्स कंपनीसाठी  मोठय़ा प्रमाणात पाण्याचा वापर होतो. खांबोरा प्रकल्पाच्या  पाठोपाठ आता कुंभारी तलावातील पाणीही संपुष्टात येत  आहे. दीड-दोन  महिन्यानंतर पाणी उपलब्ध न झाल्यास  अकोल्यातील शेकडो उद्योगांना ताळे लागण्याची शक्यता  आहे. त्यामुळे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राहुल  बन्सोड यांनी पाण्याचे पर्यायी स्रोत शोधण्याचे काम सुरू केले  आहे. एमआयडीसी परिसरातील काही खासगी विहिरींच्या  अधिग्रहणासोबतच कुंभारी तलावातील सहा विहिरींचा उ पसा करून त्यांचा व्यास वाढविण्याचा प्रस्ताव  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांच्यासमोर ठेवला जात  आहे. यासोबत शिवर-शिवणी भागात असलेल्या ३  वेगवेगळ्य़ा खदानी, कृषी विद्यापीठाच्या लगत असलेल्या  दोन खदानी,  एमआयडीसी परिसरात असलेल्या चार  खदानींमध्ये पाणी साचलेले आहे. या खदानींचा वापरही  केला जाऊ शकतो. केवळ खाद्य पदार्थांच्या उपयोगात या  पाण्याचा वापर केला जाऊ शकत नाही. मात्र एमआयडीसी तील बांधकाम, फायर स्टेशनचे बांधकाम आणि उत्पादित  वस्तूंसाठी मात्र खदानीतील पाणी वापरणे शक्य आहे. त्या  दिशेनेदेखील अधिकारी विचाराधीन आहेत. या निमित्ताने या  खदानीची स्वच्छता होण्याची शक्यताही वर्तविली जात  आहे.

गेल्या दोन वर्षाआधीपासून आम्ही एमआयडीसीच्या  अधिकार्‍यांना पाणीची कायमस्वरूपी उपाययोजना  करण्यासाठी निवेदन देत आहोत. मात्र, प्रशासनाने त्याकडे  दुर्लक्ष केले. आता तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याचे  प्रयोग सुरू होत आहेत. जीवन प्राधिकरणासह  एमआयडीसीने देखील स्वतंत्र पाइपलाइन टाकून ठेवली  पाहिजे. याशिवाय येवताजवळच्या तलावाचा वापरही केला  पाहिजे. - कैलास खंडेलवाल, अध्यक्ष, अकोला इंडस्ट्रिज  असोसिएशन.

एमआयडीसीजवळचा कुंभारी तलाव फार मोठा आहे. त्याची  खोली वाढविण्याची गरज आहे. तलावातील गाळ काढून  शेतकर्‍यांना दिल्यास, कुंभारी तलावाची क्षमता आगामी  पावसाळ्य़ात वाढू शकते. मात्र, याकडे लक्ष दिले जात नाही.  यंदा तशी परिस्थिती निर्माण झाल्याने एमआयडीसी  प्रशासनाने पुढाकार घ्यावा; अन्यथा पुन्हा ही समस्या  अकोल्यावर येऊ शकते.-विनीत बियाणी, उद्योजक, एमआयडीसी अकोला.