शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयडीसी’ सेवा शुल्क पाचपट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 14:03 IST

एमआयडीसी प्रशासनाने ३ रुपये प्रतिचौरस मीटरवरून १२, १३ आणि १५ रुपये प्रति चौ.मी. दर करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १ नोव्हेंबर २०१९ पासून सेवा शुल्क दरात पाच पटीने वाढ केली आहे. या दरवाढीविरुद्ध उद्योजकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या नियमावलीखाली उद्योजकांची लूट होत असल्याचा आरोप फेडरेशन आॅफ इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष द्वारकादास चांडक यांनी केला आहे.एमआयडीसी प्रशासनाने ३ रुपये प्रतिचौरस मीटरवरून   १२, १३ आणि १५ रुपये प्रति चौ.मी. दर करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वीच्या तुलनेत थेट पाचपट जास्त सेवा शुल्क केल्याने रोष व्य्’ाक्त होत आहेत. ज्या ठिकाणी १ एकर प्लॉटकरिता रु. १२१५ रुपये सेवा शुल्क लागत असे त्या ठिकाणी आता ६०७० रुपये भरावे लागणार आहेत. सेवा शुल्काच्या नावाखाली एमआयडीसी प्रशासनाकडून ही रक्कम घेतली जाते; मात्र त्या तुलनेत पाहिजे तशा सेवा दिल्या जात नाहीत. पथदिवे, रस्ते, कचरा, स्वच्छता आदींबाबत अद्यापही अकोला एमआयडीसी पीछाडीवर असल्याची प्रतिक्रिया अकोला एमआयडीसी असोसिएशनचे उपाध्यक्ष द्वारकादास चांडक यांनी व्यक्त केली आहे. औद्योगिक क्षेत्रातील पथदिवे बहुतांश वेळी बंद असतात.मार्गांची स्थिती केविलवाणी आहे. साफसफाईच्या नावाचीदेखील बोंब आहे. पाण्याचा निचरा, त्याची विल्हेवाट लावली जात नाही. गत दोन वर्षांपासून उद्योगांमध्ये मंदीचे सावट आहे. दरम्यान डीझल, पट्रोलची दरवाढ सातत्याने सुरू आहे. जीएसटीच्या ओझ्याखाली उद्योजक दररोज मरत आहे. ही परिस्थिती असतानादेखील सेवा शुल्कात वाढ केली जात आहे.इतर राज्यांच्या विकासाच्या तुलनेत महाराष्ट्राला स्पर्धेत टिकून राहणे कठीण झाले आहे. शासनाने लक्ष दिले नाही तर महाराष्ट्रातील उद्योग संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही. सेवा शुल्कात झालेली पाचपट दरवाढीचा विदर्भातील उदयोजकांकडून तीव्र निषेध असून, फेडरेशन आॅफ इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष द्वारकादास चांडक यांनी ही दरवाढ त्वरित रद्द करावी, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Akola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळAkolaअकोला