शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

११ हजार वीज ग्राहकांनी स्वत: पाठविले मीटर रिडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 19:55 IST

या सर्व ग्राहकांना त्यांच्या वीज वापरानुसार महावितरणकडून वीज बिल मिळाले आहे.

अकोला : महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत अकोला परिमंडलातील ११ हजार ७८१ वीज ग्राहकांनी मोबाइल अ‍ॅपद्वारे जुलै महिन्याचे स्वत:हून मीटर रिडिंग पाठविले आहे. या सर्व ग्राहकांना त्यांच्या वीज वापरानुसार महावितरणकडून वीज बिल मिळाले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासनाकडून सुरुवातीला लॉकडाऊन आणि आता अनलॉकसारख्या प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून महावितरणने गेल्या २३ मार्चपासून तात्पुरती बंद केलेली मीटर रिडिंग, वीज बिलांची छपाई व त्याचे वितरण करणे प्रतिबंधित क्षेत्र वगळता जूनपासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील किंवा ज्या ग्राहकांचे मीटर रिडिंग उपलब्ध होणे शक्य होत नाही, अशा वीज ग्राहकांना सरासरीनुसार वीज बिल पाठविण्यात येतात.मात्र महावितरणच्या मोबाइल अ‍ॅपद्वारे वीज ग्राहकांना मीटरच्या रिडिंगचे फोटो पाठवून स्वत: रिडिंग घेण्याची सोय उपलब्ध आहे. या रिडिंगप्रमाणे वीज वापराचे अचूक बिल तयार करण्यासाठी जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी मीटरच्या रिडिंगचे फोटो पाठविण्याचे आवाहन या अगोदरच करण्यात आले होते. त्यासाठी वीज ग्राहकांच्या मोबाइलमध्ये महावितरण अ‍ॅप डाउनलोड केलेले असणे गरजेचे आहे. ज्या ग्राहकांचे मीटर रिडिंग मीटर वाचकाकडून झाले नाही अशा ग्राहकांना मोबाइल अ‍ॅपवर महावितरणकडून एसएमएस पाठविला जातो. त्यामध्ये मीटर रिडिंग पाठविण्याची मुदत नमूद करण्यात येते. महावितरणच्या या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या एप्रिल महिन्यापासून १३ आॅगस्टपर्यंत परिमंडळातील एकूण ५५ हजार ११६ वीज ग्राहकांनी,तर केवळ जुलै महिन्यात यापैकी ११ हजार ७८१ वीज ग्राहकांनी मोबाइल अ‍ॅपद्वारे दिलेल्या मुदतीमध्ये स्वत:च मीटर रिडिंग पाठविले आहे.अकोला जिल्ह्यात सर्वाधिक प्रतिसादजुलै महिन्यात महावितरणकडे स्वत:हून मीटर रिडिंग पाठविलेल्या वीज ग्राहकांमध्ये अकोला परिमंडलामधील - एकूण ११,७८१ ग्राहकांपैकी अकोला जिल्ह्यातील ५५२२, बुलडाणा जिल्ह्यातील ४,७१९ व वाशिम जिल्ह्यातील १,५४० वीज ग्राहकांचा समावेश आहे. महावितरणने वीज ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा. कोरोनाच्या सावटामुळे महावितरणकडून प्रत्यक्ष रिडिंग घेण्याची प्रक्रिया झाली नसल्यास वीज ग्राहकांनी मोबाइल अ‍ॅपद्वारे दिलेल्या मुदतीत मीटर रिडिंगचा फोटो अपलोड करून मीटर रिडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरण अकोला परिमंडळाकडून करण्यात येत आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणAkola Zoneअकोला परिमंडळ