शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

एका दिवसात चक्क ६00 ग्राहकांचे मीटर रिडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:46 IST

अकोला : संगणक, रोबोट आणि ड्रोनच्या स्पीडने कार्य करणारे कर्मचारी अकोल्यात कार्यरत असून, एका दिवसात म्हणजे ड्युटीच्या आठ तासांत (४८0 मिनिट) ६00 ग्राहकांच्या वीज मीटरचे रिडिंग घेण्यात आले आहे. ही किमया अकोला शहर विभागात दिसून आली असून, महावितरणच्या आयटी विभागासाठी हा प्रकार संशोधनाचा ठरतो आहे. 

ठळक मुद्देमहावितरणच्या आयटी विभागाला आव्हानग्राहकांच्या डोळ्यात महावितरणकडून धूळफेकबसल्या ठिकाणाहून मीटर रिडिंग

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संगणक, रोबोट आणि ड्रोनच्या स्पीडने कार्य करणारे कर्मचारी अकोल्यात कार्यरत असून, एका दिवसात म्हणजे ड्युटीच्या आठ तासांत (४८0 मिनिट) ६00 ग्राहकांच्या वीज मीटरचे रिडिंग घेण्यात आले आहे. ही किमया अकोला शहर विभागात दिसून आली असून, महावितरणच्या आयटी विभागासाठी हा प्रकार संशोधनाचा ठरतो आहे. अकोला शहरातील वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल येत असल्याच्या तक्रारी अधूनमधून येत असतात. या तक्रारींचा मागोवा घेत मध्यंतरी ‘लोकमत’ने वृत्त मालिका प्रकाशझोतात आणली. बसल्या ठिकाणाहून मीटर रिडिंग केले जात असल्याचा प्रकार समोर आला. तेव्हा अकोल्यातील महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना आयटी विभागाकडून चौकशी करून कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले होते. दरम्यान, हा प्रकार नंतर बंद झाला; पण काही महिने होत नाही, तोच पुन्हा शहरात ही धूळफेक सुरू झाली आहे. महावितरणचे कार्यालय असलेल्या दुर्गा चौक भागातच सहाशे ग्राहकांना याचा फटका सोसावा लागला आहे. ९0 टक्के बिलिंग करण्याच्या वरिष्ठांच्या आदेशाच्या अंमलबजावणीतून अकोला शहर विभागाने हॅन्ड हॅडल युनिट पद्धतीचे वीज बिल आकारणीत हा घोळ करून ठेवला आहे. २0७११ आणि २0७१२ लॅटीटूट आणि लॉगीट्यूटमधील सर्व्हरमध्ये ही छेडछाड करण्यात आली आहे. १४ सप्टेंबर १७ रोजी केलेल्या या परिसरातील मीटर रिडिंगमध्ये हा प्रकार उजेडात येत आहे. दुर्गा चौक ते रतनलाल प्लॉट परिसरातील सहाशे ग्राहकांचे मीटर रिडिंग दाखविले गेले आहेत. मीटर रिडिंग करणार्‍या कर्मचार्‍यांचे कामाचेताससकाळी दहा ते सहापर्यंत जरी पकडले, तरी ४८0 मिनिट होतात. मीटर रिडिंग करणार्‍या कर्मचार्‍याने या सेकंदाच्या पलीकडे जाऊन मीटर रिडिंग घेतले आहे. त्याने ४८0 मिनिटांत ६00 ग्राहकांचे मीटर रिडिंग केले. सेकदांपेक्षाही अधिक वेगाने कार्य करणार्‍या या कर्मचार्‍याने संगणक, रोबोट आणि ड्रोनच्या स्पीडलाही मागे टाकले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अकोल्यातील ग्राहकांच्या डोळ्यात महावितरणकडून धूळफेक केल्या जात असून, बसल्या ठिकाणाहून मीटर रिडिंग केले जात आहे.

वीज मीटर रिडिंग करणार्‍या कंत्राटी एजन्सीवर आमचे पूर्ण लक्ष आहे. आमची यंत्रणाही रिडिंग करीत, वेळोवेळी आयटी विभागाकडून अकस्मात तपासणीही केल्या जाते. एजन्सीच्या गटबाजीतून अनेकदा तक्रारी होतात; मात्र ते जर खरे असेल, तर गंभीर आहे. चौकशीत तसे समोर आले, तर कारवाई करण्यात येईल.-धर्मेंद्र मानकर, शहर अभियंता, महावितरण अकोला.